मुंबई -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे कोरोना आणि हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी वाचा...
- नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २३ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर आता टाळेबंदीचा पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यापासून लॉकडाऊनमधील शिथिलता वाढवण्यात आली. मात्र, हे लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख शेअर केलाय.
सविस्तर वाचा -'लॉकडाऊन अयशस्वी', राहुल गांधींच्या ट्वीटमध्ये प्रगत देशांचे आलेख
- अहमदनगर - काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात न्याय योजना मांडली होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ती योजना अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेस आजही आग्रही असल्याचा विचार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा -देश पातळीवर 'न्याय' योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस आजही आग्रही - बाळासाहेब थोरात
- मुंबई - कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने हा रुग्ण मानसिक तणावाखाली होता. या रुग्णाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णाने केलेली ही तिसरी आत्महत्या आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाग्रस्त रुग्णाची नायर रुग्णालयात आत्महत्या; मुंबईत कोरोना रुग्णाची तिसरी आत्महत्या
- सिंधुदुर्ग - इको-सेन्सिटिव्ह झोनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच झोनमधून सिंधुदुर्ग जिल्हातील 86 गावे वगळण्यात आली आहेत. त्यात सावंतवाडी तालुक्यातील 50 पैकी 30 गावांचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुका कस्तुरीरंगन समितीने वगळला आहे. हा पट्टा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करावा, यासाठी वनशक्ती संस्था न्यायालयीन लढा देत आहे. सध्या हा लढा प्रलंबित असतानाच इको-सेन्सिटिव्ह झोनमधून राज्य शासनाने सावंतवाडीसह अन्य चार तालुक्यातील गावे वगळली आहेत. त्यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा -इको-सेन्सिटिव्हमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 86 गावे वगळली, पर्यावरणप्रेमींचा विरोध
- मुंबई - बॉलीवूड चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. अनिल सुरी यांचं बंधू राजीव सुरी यांनी ही माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचे कोरोना आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे राजीव सुरी यांनी सांगितले.