- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांसह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासह १० जणांना पद्मभूषण तर, १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कार : जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबेंसह सिंधुताई सपकाळांचाही सन्मान
- नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची सुरक्षा, कोरोना, आत्मनिर्भर भारत, लॉकडाऊन, कोरोना लस, शेतकरी आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत राय, महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी स्वतंत्रता संग्रामाला प्रेरीत केले. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता आपल्या जीवनाचे सिद्धांत आहेत. या मुल्यांचा प्रवाह आपल्या जीवनाला समृद्ध करतो. वेळेनुसार बदलत नव्या पीढीने याची सार्थकता स्थापित करावी, असे राष्ट्रपती म्हणाले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण, वाचा महत्वाचे मुद्दे...
- मुंबई -आज राज्यात 1842 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 10 हजार 948 वर पोहोचला आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 815 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.25 टक्के तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे. गेल्या काही महिन्यात आज सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णांची नोंद, 30 रुग्णांचा मृत्यू
- परभणी -आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी परभणीत खादी निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उभा करणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्री मलिक यांनी केली.
शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश - नवाब मलिक
- मुंबई - राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ते आझाद मैदानात आयोजित शेतकरी मोर्चाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले.
राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही - शरद पवार
- मुंबई -आज आपण दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देणासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या या पाठिंब्यामुळे नक्कीच त्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या लढ्याला बळ मिळेल. आपण आणि आपले शेतकरी 60 दिवस लढत आहेत, पण सरकार एक-दोन लोकांच्या हितासाठी काम करत असून त्यांना शेतकरी दिसत नाही. तेव्हा यावरून हे सरकार भांडवलदारांचे गुलाम आहे, हेच स्पष्ट होत असल्याचे म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.