- नवी दिल्ली - कोरोना विषाणूने सर्वांना आधीच जेरीस आणले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. ब्रिटनवरून प्रवास करून भारतात आलेल्या सहा प्रवांशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद शहरातील प्रयोगशाळेत सहा जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वाचा- चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले
- चेन्नई- गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.
सविस्तर वाचा- राजकीय पक्ष लॉन्च करणार नाही, रजनीकांत यांची माहिती
- मुंबई -'मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही,' असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधकांवर केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. दरम्यान, ईडीने वर्षा राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले असून त्यांना ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
सविस्तर वाचा- संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होणार
- मुंबई : सोमवारी काँग्रेसचा १३६वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कारभार भाई जगताप यांनी अधिकृतरित्या स्वीकारला. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा भाई जगताप यांनी केली.
सविस्तर वाचा- मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होईल; भाई जगतापांनी व्यक्त केला विश्वास
- हिंगोली - राज्य राखीव दल गट क्रमांक बारा येथे कर्तव्य बजावणाऱ्या एका जवानाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा-हिंगोलीत जवानाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
- मुंबई -काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, याबाबत आमचेही वेगळे मत नाही, असे म्हणत पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावर शिवसेनेने पुन्हा एकदा राग छेडला आहे. त्याचवेळी देशात भाजपविरोधात असंतोष वाढत आहे. लोकांना पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या पक्ष नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार, असा सुचक सवाल शिवसेनेने केला आहे.