पुणे- कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी बोलावे पण वस्तुस्थिती समजून निर्णय घ्यावा. शरद पवारांसोबत आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरीही एक गोष्ट निश्चित सांगतो, ते जेव्हा हा अहवाल वाचतील तेव्हा ते प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते याबाबत कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सविस्तर वाचा - ...त्यावर शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - देवेंद्र फडणवीस
मुंबई -आज राज्यात ३,८११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,९६,५१८ वर पोहोचला आहे. राज्यात आज ९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,७४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
सविस्तर वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट - गेल्या 24 तासांमध्ये राज्यात ३,८११ जणांना कोरोनाची लागण
सॅन फ्रान्सिस्को - कोविड-19 प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे अॅपलने कॅलिफोर्नियामधील सर्व 53 स्टोअर आणि लंडनमध्ये असलेलीही अनेक स्टोअर्स तात्पुरती बंद केली आहेत.
सविस्तर वाचा -वाढती कोविड-19 प्रकरणे पाहता कॅलिफोर्नियामध्ये अॅपल स्टोअर्स तात्पुरती बंद
नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील सिमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वाचा -शेतकरी आंदोलन : मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन
बुलडाणा - जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना, टायगर हिल परिसरात अंगावर बर्फ पडून वीरमरण आले. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेडचक्का येथील रहिवासी होती. त्यांच्यावर रविवारी त्यांच्या मुळगावी पळसखेडचक्का येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
सविस्तर वाचा -वीर जवान प्रदीप मांदळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड- शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही लोहा शहरातील घटना आहे.
सविस्तर वाचा -नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी
मुंबई- कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने आता मुंबईत लसीकरण मोहिमेच्या प्राथमिक कामांना वेग देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत एकूण 8 ठिकाणी लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार असून ही केंद्रे नेमकी कशी असतील याचे 'मॉडेल लसीकरण केंद्र' मुंबई महानगर पालिकेच्या कूपर रुग्णालयात तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
सविस्तर वाचा -'मॉडेल लसीकरण केंद्र' कूपर रुग्णालयात; एकूण ८ केंद्रांवर होणार लसीकरण - सुरेश काकाणी
आळंदी (पुणे) - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या घोषणेमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत बैठका पूर्ण झाल्या असून सर्व जागांवर मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसेची जोरदार तयारी
रायगड- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एका मुलाखतीत तानाजी मालुसरे यांच्याबाबत अवमान करणारे व्यक्तव्य केल्याने शिवप्रेमी आणि नरवीरप्रेमी यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. पोलादपूर तालुक्यातील तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ असलेल्या उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ व सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था तसेच नरवीरप्रेमींनी प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज जाहीर निषेध केला.
सविस्तर वाचा -आमदार प्रताप सरनाईक यांचा पोलादपूर उमरठ येथे जाहीर निषेध
रत्नागिरी -कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल साडेआठ तासानंतर सुरळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेन्टेंन्स व्हॅनला झालेल्या अपघातामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावाच्या परिसरात हा अपघात झाला होता. मेन्टेंन्स व्हॅनची मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
सविस्तर वाचा -कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू, अपघातग्रस्त मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून हटवली