- नवी दिल्ली - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. यातून मिळणारे उत्पन्न आणि आणि अनुदान ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, साडेतीन हजार कोटींचे अनुदान थेट खात्यावर जमा होणार
- मुंबई -आज राज्यात ४,३०४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,८०,८९३ वर पोहोचला आहे. राज्यात आज ९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ४,३०४ जणांना कोरोना, 95 जणांचा मृत्यू
- नाशिक - पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आलेली मूकबधीर गीता आता नाशिकला पोहचली आहे. नाशिकच्या एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीता हिचे समाधान झाले नाही.
पाकिस्तानातून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात नाशिकमध्ये; माझी मुलगी असल्याचा रमेश सोळसेंचा दावा
- नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंघू बॉर्डरवर एका शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पानिपतच्या पार्क रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी सोनिपत पोलीस तपास करत असून संबधित शेतकरी हा कर्नालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.
सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या
- मुंबई - भाजपमध्ये मागील वर्षभरापासून नाराज असलेल्या आणि पक्षाच्या एकूणच कामकाज आणि व्यवस्थेशी उबगलेले तब्बल डझनभर भाजप आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
'राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती.. भाजपचे डझनभर आमदार करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश'
- नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मागील २० दिवसांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनावरून चिंता व्यक्त केली आहे. सरकारने यावर समिती स्थापन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला तीन आठवडे झाले असून पंजाब, हरयाणासह विविध राज्यातील शेतकरी सिंघू सीमेकडे कूच करत आहेत.