- पलवल- केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाचा १७ वा दिवस आहे. पलवलमध्ये मध्य प्रदेश आणि बुंदेलखंडचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनास्थळी पोहोचले होते.
सविस्तर वाचा-मोदी सरकारने कृषी कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले; बच्चू कडूंचा 'प्रहार'
- कोल्हापूर -कर्नाटकच्याबेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर अॅसिड हल्ला झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार भर बाजारपेठेमध्ये घडला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
सविस्तर वाचा-संतापजनक..! बेळगावच्या रायबागमध्ये महिलेवर अॅसिड हल्ला
- अमरावती - येत्या दहा दिवसात शेतकरी आंदोलनाचा तोडगा न निघाल्यास पुन्हा रेल्वेने 10 हजार शेतकऱ्यांसह दिल्लीत धडक देऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. हरयाणातील पलवल येथे शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पोहोचले असता ते बोलत होते.
सविस्तर वाचा-'...तर 10 हजार शेतकऱ्यांसह दिल्लीत पुन्हा धडक देऊ'
- मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस साजरा केला जात आहे. देशाच्या राजकारणात शरद पवारांचे दबदबा आजही कायम आहे. सर्वाधिक संसदीय कार्यकाळ पूर्ण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा-शरद पवारांचा ८० वा वाढदिवस : पंतप्रधान मोदींसह देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव
- मुंबई- राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवडी–वरळी कनेक्टरसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, मुख्य अभियंता (रस्ते) दराडे आदी उपस्थित होते.
सविस्तर वाचा-शिवडी – वरळी कनेक्टरसंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
- कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू होती. मात्र पवार साहेबांनी त्याचे खंडन केले आहे. हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. केंद्रात आघाडी झाली तर शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न राहील, असेही मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.