- मुंबई- केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०१० साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सविस्तर वाचा-कृषी कायद्याविरोधात आघाडीची भूमिका दुटप्पी, पवारांचीच कायद्याला शिफारस - फडणवीस यांचा घणाघात ...
- रायगड - रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची अर्णब गोस्वामी यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने अर्णब गोस्वामी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा-अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; सीबीआयकडे तपास देणारी याचिका फेटाळली
- भंडारा - शरद पवार यांनी 2010 मध्ये कृषीमंत्री असताना लिहिलेले पत्र खरे असून ते पत्र एकदा वाचा, त्याला समजा आणि मग विरोध करा, असा सल्ला प्रफुल पटेल यांनी विरोधकांना दिला आहे. ते आज पवनी येथे कृषीउत्पन्न बाजार समितीतील कार्यक्रमात बोलत होते. पत्रात शरद पवार यांनी केवळ तात्विक गोष्ट नमूद केली असून कायदा कसा असावा, याचा उल्लेख केलेला नाही. असे असताना हे पत्र दाखवून विरोधक केवळ दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा-"शरद पवारांचे पत्र समजून घ्या... मगच चर्चा करा!"
- मीरा भाईंदर(ठाणे) - उत्तन परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उत्तन परिसरातील धावकी या ठिकाणी बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. स्पेशल टीमला पाठवून छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये दोन महिला दलालासह चार पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-उत्तन पोलीस ठाणे परिसरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
- मुंबई- अभिनेत्री जारा खान हिला तिच्या सोशल माध्यमांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे . गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री जारा खानला इन्स्टाग्राम सारख्या एका अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. यासंदर्भात अभिनेत्रीने मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
सविस्तर वाचा-अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक
- दिल्ली- गेल्या १२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरूच ठेवत उद्या मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद ची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.