- मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. आरबीआयने रेपो दर हा ४ टक्के ठेवण्याचा निर्णय दास यांना पतधोरण समितीच्या तीन दिवसीय पत्रकार परिषेदत आज जाहीर केला आहे.
सविस्तर वाचा-आरबीआयकडून रेपो दर 'जैसे थे'; अर्थव्यवस्था कोरोनाच्या लढ्यात निर्णायक टप्प्यावर
- उस्मानाबाद -मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून आज तुळजाभवानी मंदिराच्या समोरच जागरण गोंधळ घालून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चाकडून तिसरे पर्व सुरू झाले असून हा मूक मोर्चा नसून ठोक मोर्चा आहे, असे सांगितले जात आहे.
सविस्तर वाचा-तुळजाभवानीच्या जागर गोंधळाने मराठा मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात
- मुंबई - सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या मृत्यूबाबत शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मृत्यू रहस्यमय असल्याचा उल्लेख शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आहे.
सविस्तर वाचा-अश्विनीकुमार मृत्यू प्रकरण : काळ मोठा कठीण आला आहे... सामनातून 'रहस्यमय मृत्यू'चा उल्लेख
- चंद्रपूर- दोन मित्र आज मॉर्निंग वॉकला गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. अज्ञात वाहनाने या दोघांनाही चिरडले. ज्यात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा गावाजवळ घडली. मृतकांची नावे प्रशांत मुरलीधर सहारे आणि रोहित अशोक चट्टे अशी आहेत. हे दोघेही 18 वर्षांचे होते.
सविस्तर वाचा-ब्रम्हपुरीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
- लातूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरातील रेल्वेसेवा बंद होती. आता अनलॉकला सुरवात झाली असून सर्वकाही हळूहळू पूर्ववत होत आहे. त्याच अनुषंगाने लांबपल्ल्याच्या रेल्वे सुरू होत आहेत. 11 ऑक्टोबरला लातूर-मुंबई रेल्वे धावणार आहे. रेल्वे बोर्डाकडून तसे पत्रक जारी करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लातूर-मुंबई रेल्वेला ग्रीन सिग्नल
- मुंबई :२०१९च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपला बहुमत दिले होते. मात्र, ऐनवेळी झालेल्या विश्वासघातामुळे पक्षाला सत्तेपासून दूर रहावे लागले. लवकरच हे तीनही (सत्ताधारी) पक्ष विरोधी पक्षात बसतील आणि भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली. भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीला मार्गदर्शन करताना नड्डा बोलत होते.
सविस्तर वाचा-भाजपची राज्यात लवकरच एकहाती सत्ता येणार; जे.पी. नड्डांचा दावा
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नेते उपस्थित आहेत.