- मुंबई -देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात गेल्या सहा वर्षांत (२०१३ ते २०१९) या दरम्यान 2 हजार 620 खटले नोंदवले गेले. रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1 हजार 39 मुलांना सोडवण्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिक सिग्नलवर, लोकल ट्रेन, गजबजलेल्या बाजारात लहान मूल भीक मागताना आढळतात. लहान मुलांना भीक मागण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे काही प्रकरणांतून समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत अनेक भीक मागणाऱ्या लहान मुलांची सुखरूप सुटका केली आहे.
सविस्तर वाचा :ईटीव्ही भारत विशेष : गेल्या 6 वर्षांत मुंबईतून भीक मागणाऱ्या 1 हजार 39 मुलांची सुटका
- मुंबई - शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, असे समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिकच नव्हे, सर्वसामान्य मुंबईकर दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. यंदा मात्र या मेळाव्यावर कोरोनाचे सावट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या फेसबुक लाइव्ह या ऑनलाइन व्यासपीठाचा वापर करत जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे दसरा मेळावाही ऑनलाइन घेण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा :'जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो...', यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन?
- नवी दिल्ली :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. या तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. १४ सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाले होते. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता.
सविस्तर वाचा :युपी सामूहिक अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- मुंबई - ड्रग्ज प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या ही जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. या दोघांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील प्रयत्न करत आहेत. तर या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी एनसीबीचे वकिल प्रयत्नशील आहेत.
सविस्तर वाचा :ड्रग्ज प्रकरण : 'रियाला जामीन द्या', वकिलाने केला 'असा' युक्तीवाद
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मागील दीड महिन्यांपासून सीबीआयकडून सुरू आहे. यात आता एम्स रुग्णालयाच्या तज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या सुशांतच्या विसरा फॉरेन्सिक रिपोर्टची पडताळणी सीबीआयचे पथक करणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय सुशांतच्या कुटुंबियांची पुन्हा चौकशी होणार असल्याचे समजते.
सविस्तर वाचा :सुशांतच्या कुटुंबीयांची सीबीआय करणार पुन्हा चौकशी; एम्सच्या रिपोर्टचीही होणार पडताळणी
- नवी दिल्ली :गेल्या 24 तासांमध्ये देशात 70 हजार 589 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 61 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.