- मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (२६ सप्टेंबर) भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर राऊत आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही भेटीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहे. अशात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी परिस्थिती असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. सविस्तर वाचा
- मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन कोटींचे नुकसान भरपाईची मागणी कंगनाने याचिकेत केली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली. सविस्तर वाचा
- मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कार्यालवर(बंगला) कारवाईबाबत विचारणा करणार्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कठोर वक्तव्य केले आहे. मुंबई हायकोर्टाने असा प्रश्न उपस्थित केला की एका प्रकरणात बीएमसीने चार तारखेला नोटीस दिली आणि 8 तारखेला कारवाई झाली. दुसर्या प्रकरणात, पालिकेने 5 तारखेला नोटीस दिली आणि 14 रोजी कारवाई करण्यात आली. परंतु कंगना रणौतच्या बाबतीत 8 तारखेला नोटीस देण्यात आली व 9 रोजी कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयात आजची सुनावणी सुमारे साडेपाच तास चालली. सविस्तर वाचा
- नवी दिल्ली -कृषी कायद्याविरोधात देशभरातून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच कर्नाटकमध्ये विविध शेतकरी संघटनांनी कृषी उत्पाद बाजार समिति (एपीएमसी) आणि भूमी सुधार कायद्यामध्ये येडीयुरप्पा सरकारद्वारे करण्यात आलेल्या सुधारणेविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचाही विरोध केला. सविस्तर वाचा
- नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'अटल' या मूर्तीची प्रतिष्ठापना शिमल्यात होणार आहे. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांच्या हस्ते तयार केली जाणार आहे. मूर्ती कांस्य धातूने बनवण्यात येणार असून तिची उंची ९ फूट असणार आहे. याबाबत राम सुतार यांचे चिरंजीव अनिल राम सुतार यांच्याशी चर्चा केली असता, पुढच्या महिन्यापर्यंत मूर्ती तयार करून तिला हिमांचल सरकारला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा
- दुबई -आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून विराटसेनेला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही नाणेफेकीचा मान राखत मुंबईसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले आहे. सविस्तर वाचा
- मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कार्यालवर(बंगला) कारवाईबाबत विचारणा करणार्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कठोर वक्तव्य केले आहे. मुंबई हायकोर्टाने असा प्रश्न उपस्थित केला की एका प्रकरणात बीएमसीने चार तारखेला नोटीस दिली आणि 8 तारखेला कारवाई झाली. दुसर्या प्रकरणात, पालिकेने 5 तारखेला नोटीस दिली आणि 14 रोजी कारवाई करण्यात आली. परंतु कंगना रणौतच्या बाबतीत 8 तारखेला नोटीस देण्यात आली व 9 रोजी कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयात आजची सुनावणी सुमारे साडेपाच तास चालली. सविस्तर वाचा
- पंढरपूर (सोलापूर) -पंढरपुरातील कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे आणि भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा.ना. उत्पात यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सविस्तर वाचा
- वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेमध्ये 3 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रचार मोहीम जोरदार सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्या दरम्यान मंगळवारी प्रेसिडेंशियल डिबेट होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिबेटच्या आधी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना ड्रग्जची चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. सविस्तर वाचा
- मुंबई: राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. पण आता राज्याची चिंता वाढवणार आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात रेमडेसीविर इंजेक्शनची गरज अर्थात मागणीही वाढली आहे. 20 सप्टेंबर आधी राज्यात जिथे दिवसाला 9 हजार इंजेक्शन लागत होते तिथे गेल्या आठवड्यापासून दिवसाला सरासरी 21 हजार इंजेक्शन लागत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. याचाच अर्थ गंभीर रूग्ण वाढत असून त्यामुळे ही चिंताजनक बाब मानली जात आहे. सविस्तर वाचा
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
top ten 11 pm
Last Updated : Sep 28, 2020, 10:58 PM IST