नवी दिल्ली - कोरोनाविरोधात भारतील लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळण्यापासून आणखी दूर असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे. हर्षवर्धन यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सेरो सर्व्हे (Sero Survey) दाखला दिला आहे. आयसीएमआरचे पथक कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा:'भारतीय लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळविण्यापासून आणखी दूर'
मुंबई - कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयके मंजूर करून घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत, यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष या शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. तसेच राऊत, फडणवीसांच्या भेटीसंदर्भात बोलताना शिवसेना आमच्या सोबत असल्याचे थोरात म्हणाले.
सविस्तर वाचा:'शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार, शिवसेना आमच्या सोबत'
नवी दिल्ली - कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज स्वाक्षरी केली. त्यामुळे, आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये, अशी विनंती विरोधी पक्षांनी केली होती.
सविस्तर वाचा:शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
शारजाह -आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपला तिसरा सामना खेळण्यासाठी आज मैदानात उतरला. त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान आहे. राजस्थानने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला होता. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा:RR vs KXIP LIVE : पंजाबची भन्नाट सुरुवात
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल (शनिवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा:राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -महाविकास आघाडी सरकारचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे, हे सरकार स्वतःच्या कृतीतूनच ढासळणार आहे. त्यामुळे, शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापनेची कोणतीही चर्चा नाही व करणारही नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबद्दत त्यांना विचारले असता ते बोलत होते.
सविस्तर वाचा:'..म्हणून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही, 'त्या' अटीवर चर्चा करण्यासाठीच राऊत यांची भेट'
नवी दिल्ली - नागरी उड्डाण मंत्रालयाने सहा विमानतळे खासगी उद्योगांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून टीका झाली. त्यानंतर आता यामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) लक्ष घातले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सीव्हीसीने दिले आहेत. तसेच, आरोपांची चौकशी सुरू करण्यासही सांगितले आहे.
सविस्तर वाचा:विमानतळे भाडेपट्टीच्या व्यवहारावर केंद्रीय दक्षता आयोगाचं बोट.. चौकशीचे आदेश
पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळेराज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. यात उद्योग व्यवसाय बंद झाले तर काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना वाढीव वीज बिलामुळे अजून संकट निर्माण झाले आहे. शरद पवार हे राज्य सरकारचे मार्गदर्शन म्हणून काम पाहतात. वाढीव वीज बिलाचा योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर वीज बील माफ करावे, अन्यथा पंढरपूरमध्ये शरद पवार यांना पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांनी दिला.
सविस्तर वाचा:'..अन्यथा शरद पवारांना पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही'
नवी दिल्ली -दिल्ली कॅपिटल्सने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला सहज नमवल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी संथ खेळ केला.
सविस्तर वाचा:''धोनी फलंदाजीसाठी लवकर येण्याआधीच भारतात बुलेट ट्रेन येईल''
मुंबई- अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी पायलने अनुरागविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, असे करून १ आठवडा उलटला असूनही अद्याप या प्रकरणी काही कारवाई न झाल्याने पायलने वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वाचा:अनुराग प्रकरणी न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसणार- पायल घोष