- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल (शनिवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा :राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- नवी दिल्ली - कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज स्वाक्षरी केली. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये, अशी विनंती विरोधी पक्षांनी केली होती.
सविस्तर वाचा :शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
- भोपाळ - वडिलांनी ल्युडो खेळात अनेकदा पराभव केल्यावरून एका 24 वर्षीय तरुणीने कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली, असे कौटुंबीक न्यायालय सल्लागार सरिता रजनी यांनी सांगितले. 'हल्ली मुले पराभव पचवू शकत नाहीत आणि म्हणूनच अशी प्रकरणे समोर येतात. त्यांनी पराभवाचा स्वीकार करायला शिकणे आवश्यक आहे. जिंकणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पराभवही महत्त्वाचा आहे,' रजनी म्हणाल्या.
सविस्तर वाचा :भोपाळ : वडिलांसोबत ल्युडो खेळात हरल्यानंतर तरुणीची कौटुंबीक न्यायालयात धाव
- मुंबई -महाविकास आघाडी सरकारचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे हे सरकार स्वतःच्या कृतीतूनच ढासळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापनेची कोणतीही चर्चा नाही व करणारही नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबद्दत त्यांना विचारले असता ते बोलत होते.
सविस्तर वाचा :'..म्हणून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही, 'त्या' अटीवर चर्चा करण्यासाठीच राऊत यांची भेट'
- जळगाव - राजकारणात कुणी मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारण ही विचारांची लढाई असते. कोणत्याही दोन राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगावातील एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. काल मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली होती.
सविस्तर वाचा :राजकारणात कुणी मित्र किंवा शत्रू नसतो - गुलाबराव पाटील
- जळगाव :जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीचा ताबा घेतला. आता मीच ‘डीन’ असा आविर्भाव दाखवत ते ‘डीन’च्या खुर्चीवर बसले आणि टेबलावर पाय टाकून बसून ‘मी सर्वांचा बॉस आहे’, असे सांगत आज सकाळी गोंधळ घातला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद हे त्यांच्या कार्यालयात होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने तेही चक्रावून गेले.