मुंबई - कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढतच असून गेल्या 24 तासांत राज्यात 19 हजार 164 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 82 हजार 963 झाली आहे. राज्यात 2 लाख 74 हजार 993 सक्रिय रुग्ण आहेत.
सविस्तर वाचा -राज्यात 19 हजार 164 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ
- मुंबई - कोरोनाचे संकट आणि जागतिक अर्थव्यवस्थांमधील खराब परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारांची पडझड सुरूच आहे. आज सेन्सेक्समध्ये १,११५ अंशांची मोठी घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात निराशाजनक परिस्थिती असताना आज प्रमुख निर्देशांकांनी मोठी आपटी नोंदवली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला.
सविस्तर वाचा -शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स १,११५ अंशांनी घसरला
- कोल्हापूर - पाशवी बहुमताच्या जोरावर कृषी विधेयक मंजूर केले, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या कृषी विधेयकाने पारतंत्र्यातील शेतकरी स्वतंत्र झाल्याचा दावा केला, शरद जोशी याचा दाखल देत त्यांचे स्वप्न साकार झाले, असे अनेकांनी सांगितले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. बाजार समिती हे तर शेतकऱ्यांचे कत्तलखाने व राजकीय अड्डे, शरद जोशींच्या मताशी मी सहमत आहे. समांतर व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केंद्र सरकारचा असेल तर चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांकडून चांगला हमीभाव मिळत असेल तर आमचा विरोध नाही, पण त्या अगोदर हमीभाव कायदा मंजूर करावा लागेल, असे शेट्टी म्हणाले.
सविस्तर वाचा :EXLCUSIVE : शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा खासगी कंपन्यांचा डाव, हमीभाव मिळत असेल तर आमचा विरोध नाही
- नागपूर- जम्मूत दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले आहे. नरेश बडोले, असे त्या हुतात्मा जवानाचे नाव असून ते जम्मूत आपले कर्तव्य बजावत होते.
सविस्तर वाचा :जम्मूत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण
- जळगाव- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. गुरुवारी जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले. सोने 100 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल अडीच हजाराने कमी झाले आहेत.
सविस्तर वाचा :जळगावात चांदीसह सोने पुन्हा घसरले; आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री वाढल्याचा परिणाम
- ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात काल अळ्या सापडल्या. सोयाबीनच्या भाजीत या अळ्या सापडल्या असून या धक्कादायक प्रकराबाबत रुग्णांनी कोविड सेंटरमधील महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तत्काळ हे जेवण बदलण्यात आले असून याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
सविस्तर वाचा :धक्कादायक..! टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या जेवणात अळ्या
- जळगाव - बॉलिवुडचे काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअॅप चॅटवरून ड्रग्ज संदर्भात काही नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, फक्त व्हाट्सअॅप चॅट हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही. त्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) या प्रकरणाची पाळेमुळे शोधावीच लागतील, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.