महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top ten news stories around the globe
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या...

By

Published : Sep 22, 2020, 7:31 AM IST

Updated : Sep 22, 2020, 7:05 PM IST

  • नाशिक - मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी गंभीर आहे. मागच्या सरकारने दिलेले वकील व आम्ही दिलेले नवीन वकील एकत्रितपणे न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाबाबत राजकीय स्वार्थासाठी कोणी कोल्हेकुई करू नये, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना लगावला आहे.

सविस्तर वाचा :मराठा आरक्षणावर राजकीय स्वार्थासा‍ठी 'कोल्हेकुई' करू नये; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

  • नागपूर -राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद मी ऐकली आहे. त्यात त्यांनी शेती विषयक विधेयकाला कुठेही विरोध केला नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवारांनी संसदेत जे घडले आहे, त्यात दोषी असलेल्या खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्या कारवाईच्या निमित्ताने त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे फडणवीस म्हणाले. एवढंच नाही तर संसद सदस्यांनी अशोभनीय कृती केली नसती तर शरद पवारांना एक दिवसाचा उपवास करावा लागला नसता, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.

सविस्तर वाचा :'पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, संसदेत घडलेल्या प्रकाराच्या माध्यमातून विरोधकांना पाठिंबा'

  • बर्लिन -कोरोनाच्या महामारीमुळे सोशल डिस्ट्न्सिंग हा नियम पाळणे सर्वत्र सुरु आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे आपल्या विविध संसर्ग टाळता येतात. मात्र, जर्मनीतील एका फुटबॉल संघाला सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रतिस्पर्धी संघाकडून ०-३७ने पराभव स्वीकारावा लागला आहे.

सविस्तर वाचा :सोशल डिस्टन्सिंगमुळे फुटबॉल संघाचा ०-३७ने पराभव

  • मुंबई -केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतकऱ्यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे कृषीक्षेत्रात कंपनीराज येणार आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सविस्तर वाचा :'देशातील शेतकऱ्यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव'

  • मुंबई -सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात आज रिया व शोविक यांच्यासह सहा आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे, या अर्जावर उद्या (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

सविस्तर वाचा :रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ

  • मुंबई -राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ही विधेयकं तातडीने मंजूर करावी, असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. विरोधकांना काही आक्षेप होते, तरीही सरकारने काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न केला, अशी टीका शरद पवारांनी केली. केंद्र सरकारच्या राज्यसभेतील कृतीबाबत सहा खासदारांनी आंदोलन सुरू केले आहे. मी आज त्याच्या अभियानात सहभागी होणार आहे. आज दिवसभर मी अन्नत्याग करणार. काल राज्यसभेत जे घडत नाही ते बघायला मिळालं. मला काल दिल्लीला जाता आलं नाही, असे शरद पवार म्हणाले.

सविस्तर वाचा :'सदस्यांच्या अभियानात सहभागी होणार, आज दिवसभर मीदेखील अन्नत्याग करणार'

  • सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालतावाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता सातारच्या प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

सविस्तर वाचा :ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, साताऱ्याच्या प्रतिभा रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

  • ठाणे - भिवंडीच्या धामणकर नाका, पटेल कंपाऊंड परिसरात असलेली एक ३ मजली इमारत सोमवारी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

सविस्तर वाचा :Live : भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा २० वर.. मदत व बचावकार्य सुरूच

  • मुंबई - कंगना रणौतच्या मालमत्तेवरील कारवाईसंदर्भात महापालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आजची सुनावणी उद्यावर टळली आहे. कंगनाने संजय राऊत आणि भाग्यवंत लोटे ह्यांना प्रतिवादी करण्याची विनंती हायकोर्टाकडे केली होती. त्यासंदर्भात आता उद्या कोर्टात उत्तर देण्यात येईल.

सविस्तर वाचा :महानगरपालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर कंगनाचे हायकोर्टात उत्तर दाखल, आजची सुनावणी उद्यावर

  • दुबई -यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना २० कोटी लोकांनी पाहिला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पार पडला. शहा यांच्या मते, इतर कोणत्याही देशातील कोणत्याही खेळाचा उद्घाटनाचा सामना पाहणारे हे सर्वाधिक लोक आहेत.

सविस्तर वाचा :काय सांगता?, 'इतक्या' लोकांनी पाहिला यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना

Last Updated : Sep 22, 2020, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details