महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - Top 10 @ 11 PM

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 11 PM
रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Sep 13, 2020, 7:38 AM IST

Updated : Sep 13, 2020, 10:38 PM IST

  • मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना आतापर्यंतच्या दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ झाली आहे.

सविस्तर वाचा-राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग : आजही २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण

  • मुंबई -रविवारी मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 85 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 27 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. याबरोबरच मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 69 हजार 693 वर पोहचला आहे.

सविस्तर वाचा-मुंबई कोरोना अपडेट : 24 तासांत नवीन 2085 रुग्णांची नोंद, 41 रुग्णांचा मृत्यू

  • नवी दिल्ली -आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने लीगच्या आगामी हंगामासाठी आपला माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली आहे. फ्रेंचायझीने रविवारी निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली.

सविस्तर वाचा-फिरकीच्या जादुगाराची राजस्थान रॉयल्समध्ये पुन्हा 'एन्ट्री'

  • यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत ४ हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर, तसेच कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७३ नागरिक 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा-यवतमाळ: जिल्ह्यात २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू, २५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  • अकोला- देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. अशा गंभीर परिस्थितीत आज जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ची परीक्षा पार पडली. शहरातील १९ व अकोट येथील २ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आत परीक्षा देत होते, तर त्यांचे पालक चिंतेत केंद्राबाहेर उभे होते.

सविस्तर वाचा-अकोल्यात ‘नीट’ शांततेत पार, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद

  • मुंबई - कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी मदन शर्मा या व्यक्तीला शिवसैनिकांनी जबर मारहाण केली. या शर्मा याची आज आठवले यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मदन शर्मा माजी नौदल अधिकारी असल्याचे बोलले जाते.

सविस्तर वाचा-कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, आठवलेंचा शिवसेनेला इशारा

  • मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या स्थगितीनंतर हे आरक्षण आणि त्यावर दिलेली स्थगिती उठवण्यासाठी तसेच न्यायालयीन बाजू कशी मांडता येईल, यासाठी आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली.

सविस्तर वाचा-मराठा आरक्षण प्रकरण : विरोधीपक्षासोबत चर्चा करुन निर्णय घेणार - अशोक चव्हाण

  • के.चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यावर आपल्या सरकारचा निर्धार जाहिर केला होता. आपण आता अनेक त्यागांनंतर मिळवलेल्या आमच्या तेलंगाणाची पुनर्उभारणी करू या...विकास करू या. केसीआर सरकारने आता एक नवीन महसूल कायदा अमलात आणून जमिन सुधारणेच्या एका नव्या युगात राज्याचा प्रवेश केला आहे.

सविस्तर वाचा-तेलंगाणामध्ये जमिनीच्या बेकायदा नोंदींना पूर्णविराम...

  • नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देश तत्वे जारी केले आहेत. सध्या घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपायांकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात आहे.

सविस्तर वाचा-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी ?

  • विरार (पालघर) - मुंबईतील जोगेश्‍वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोघा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा-बाईक राईडचा आनंद बेतला जीवावर, जोगेश्‍वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले!

Last Updated : Sep 13, 2020, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details