- पाटणा- मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकार विरोधात वाद सुरू आहे. कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर हा वाद पेटला. आता बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू नैयर यांनी सीजेएम न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा -'कंगना'प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल
- मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राज्याने एकूण 10 लाख कोरोना रुग्णांचा आकडा ओलांडला आहे. आज दिवसभरात 24 हजार 886 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर, 393 रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा -दिवसभरात कोरोनाची सर्वोच्च वाढ; राज्याने ओलांडला 10 लाखांचा आकडा
- मुंबई - मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे-जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशीदेखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते, पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वाचा -मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही - मुख्यमंत्री
- मुंबई -कोरोनामुळे निधन झालेल्या सहकारी डॉक्टरला सरकारने विमा कवच नाकारले गेल्यामुळे डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. याभेटी दरम्यान डॉक्टरांच्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी सरकारविरोधात डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या समस्यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि सरकारसोबत चर्चा करू, असे राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला सांगितले.
सविस्तर वाचा :विम्याच्या प्रश्नासंदर्भात खासगी डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
- मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत हिच्या आई आशा रणौत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. म्हणूनच भाजपाचे लोक कंगनाला झाशीची राणी ही उपमा देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीचे एकूणच कारस्थान भाजपाचेच आहे, हे स्पष्ट झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी ट्विट करून कंगनाच्या आईने केलेल्या भाजपामधील प्रवेशाची माहिती देत तिला भाजपाकडून झाशीची राणी ही उपमा त्यासाठी दिली जात आहे. यामुळेच कंगनाच्या आडून महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान भाजपाचेच आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुंबईला पाकिस्तान म्हणून भाजपाने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आणि त्यासोबतच 106 हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे, असा आरोपही सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
सविस्तर वाचा :'महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान भाजपाचेच'
- मुंबई - कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने जनतेला अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. खासगी लॅबशी संगनमत करून राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केली आहे. याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.