महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ १ PM : दुपारी १ पर्यंतच्या ठळक बातम्या!

दुपारी १ पर्यंतच्या ठळक बातम्या!

top-ten-news-stories-across-the-world
Top 10 @ १ PM : दुपारी १ पर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : Oct 3, 2020, 9:32 AM IST

Updated : Oct 3, 2020, 1:17 PM IST

  • नरसिंहपूर -यूपीच्या हाथरस आणि बलरामपूर बलात्कार प्रकरणांनंतर मध्य प्रदेशात नरसिंहपूर जिल्ह्यातील एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, पीडिता तिच्या कुटुंबीयांसोबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता. तिची तक्रार घेण्यात आली नाही. उलट पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याची घटना घडली. ही तक्रार दाखल न झाल्यानंतर पीडितेने आत्महत्या केली. नरसिंहपूरच्या चिचली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावात हे प्रकरण घडले.

सविस्तर वाचा -मध्य प्रदेशात महिलेवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी तक्रार न घेतल्याने पीडितेची आत्महत्या

  • जालना- उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, अशी त्यांची प्रवृत्ती असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. दरेकर हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या घरी काही वेळ थांबले असता, दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

सविस्तर वाचा -हाथरस प्रकरणात शरद पवारांचे पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांचा टोला

  • नवी दिल्ली - तुम्ही महामारीत कर्जफेडीकरता मुदतवाढ घेतली असेल तर, ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुदतवाढ दिलेल्या कालावधीत लागू होणाऱ्या व्याजावरील व्याज (चक्रवाढ व्याज) माफ करण्याची तयारी दर्शविली आहे. सहा महिन्यांपर्यंत २ कोटीपर्यंतचे कर्जफेडण्यासाठी मुदतवाढ घेतल्यास ही सवलत देऊ, असे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

सविस्तर वाचा -कर्जफेडीच्या मुदतवाढीतील चक्रवाढ व्याज माफ करू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

  • नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 79 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 64 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा -भारतात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला 1 लाखाचा टप्पा; बाधितांचा आकडा 64 लाखांवर

  • मुंबई- कोरोनामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लागला होता. त्यानंतर मुंबई पुन्हा पूर्व पदावर येऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी मुंबईची लाईफलाईन रुळावर धावू लागल्यानंतर आता, मुंबईतील डब्बेवाल्यांनाही सुद्धा या लोकल गाड्यांमध्येही प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईचे डब्बेवाले आता परत आपल्या व्यवसायासाठी 'मिशन बिगीन अगेन' च्या तयारीला लागले आहेत.

सविस्तर वाचा -प्रवासाला हिरवा कंदील! मुंबईतील डब्बेवाले आता "मिशन बिगीन अगेन" च्या तयारीत

  • सोलापूर- विधानसभा निवडणुकीत वेगवेगळी आमिषे दाखवून राज्यात उद्धव ठाकरे सत्तेवर आले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले आहेत. परंतु खोटी आमिषे दाखवुन लाभ घेणे हा एक प्रकारचा फसवणूकीचा गुन्हा आहे. याविरोधात सोलापूर येथील विजापुर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे याना आम आदमी पार्टीच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. शिवाय ठाकरे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -निवडणुकीत दिलेले आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

  • मुंबई- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्राध्यापक पुष्पा भावे यांचं आज निधन झालं. पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध विदुषी, समाजकार्यकर्ती, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक पुष्पा भावे यांनी आज रात्री १२.३० मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर वाचा -ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि प्राध्यापिका पुष्पा भावे यांचे मुंबईत निधन

  • जालना- राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, कदाचित त्यांचा तोल गेला असावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भोकरदन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलन स्थळी दानवे यांनी भेट दिली. त्यावेळी हाथरसला भेट द्यायला जाणाऱ्या राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की संदर्भात विचारणा केली असता, दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा -'राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, कदाचित त्यांचा तोल गेला असावा'

  • लखनऊ- हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दरम्यान, योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा -हाथरस सामूहिक बलात्कार: पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन

  • ठाणे- 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५० लाख रुपये देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी,' अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे काकांनी उल्हासनगरमध्ये दिली आहे. योगी सरकारने पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली, या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा -'५० लाख रुपये देतो मुख्यमंत्री पद सोडा', हाथरस पीडितेच्या काकांचे मुख्यमंत्री योगींना आव्हान

Last Updated : Oct 3, 2020, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details