- मुंबई - लॉकडाऊन काळात राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत दर दिवशी भर पडत असून राज्य पोलीस दलात कोरोनाच्या संसर्गामुळे 33 पोलिसांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबधित 1 हजार 497 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 196 पोलीस अधिकारी तर 1 हजार 301 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा -राज्यात 33 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, 1 हजार 497 जणांवर उपचार सुरू
- पुणे- सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 6 जून) सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वाचा -दारुड्यांच्या धक्काबुक्कीत माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी, दोघे अटकेत
- मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -मुंबईकरांना दिलासा.. सोमवारपासून बेस्टच्या बसमधून सामान्य लोकांना करता येणार प्रवास
- औरंगाबाद- केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानुसार दोघांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -VIDEO : औरंगाबादेत भूतदयेला तिलांजली, दुचाकीला कुत्रा बांधून नेले फरफटत
- पाटणा - बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर-वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत. शहरात लागेल्या पोस्टर्सवर 'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली' असे लिहिले आहे.
सविस्तर वाचा -'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली'; बिहारमध्ये पोस्टरवॉर
- नवी दिल्ली -मणिपूरमधील कांगपोकली जिल्ह्यामध्ये एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन सेंटरमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जन्म झाल्यामुळे बाळाचे नाव इमॅन्युअल क्वारंटीनो असे ठेवले आहे.