मुंबई -राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने लॉकडॉऊन 31 मेपर्यंत वाढवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज (रविवारी) यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज 17 मेला संपत आहे.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत, राज्य सरकारचा निर्णय
सिंधुदुर्ग- बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या परवानगीशिवाय ई-पास देण्यात येऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी इतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांना दिले आहे. सध्या जिल्ह्यात असलेले ८ रुग्णही मुंबई, ठाणे परिसराशी संबंधीत असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
सविस्तर वाचा -'आपल्या परवानगीशिवाय जिल्ह्यात ई-पास देऊन कोणालाही पाठवू नका'
बीड -न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातएका कुमारी मातेचा विवाह लावून देण्यात आला. स्वाधार गृहाचे प्रमुख एस.बी.सय्यद यांच्या मध्यस्थीने हा विवाहसोहळा पार पडला. यामुळे एका मुलीचं साडेतीन वर्षानंतर पुनर्वसन झाल्यामुळे एक आदर्श विवाह म्हणून याकडे पाहिल जातंय.
सविस्तर वाचा - ....आणि तीन वर्षांची चिमुकली उपस्थित राहिली जन्मदात्या आई-वडिलांच्या लग्नाला!
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक पॅकेजचा शेवटचा पाचवा टप्पा वेळात जाहीर करत आहेत. यामध्ये सात आर्थिक उपाययोजना जाहीर करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कंपन्यांच्या संचालक मंडळांना व्हिडिओद्वारे बैठक घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली- देशातील सर्व राज्यांचा डिसेंबर ते मार्चदरम्यानचा जीएसटी मोबदला रखडल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यांनी ही माहिती आत्मनिर्भर अशी संकल्पना असलेल्या आर्थिक पॅकेजचा अखरेचा टप्पा घोषित करताना माध्यमांनी दिली.
संचालक मंडळांना व्हिडिओद्वारे बैठक घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -केंद्र सरकारकडे राज्यांचा चार महिन्यांचा जीएसटी मोबदला थकित
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाने अर्थव्यवस्था विस्कळित झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील १३.५ कोटी जणांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. तर १२ कोटी लोक गरिबीत ढकलले जातील, असे एका अहवालात म्हटले आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाचे संकट : १३.५ कोटी नोकऱ्यांवर संक्रात; १२ कोटी जण गरिबीत ढकलले जाणार
वाराणसी- लंडनमध्ये 170 भारतीय कोरोनाच्या संचारबंदीमुळे अडकलेले आहेत. वंदे भारत अभियानानुसार या नागरिकांना परत आणण्यासाठी वाराणसीतील लाल बहाद्दुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण तयारी झाली आहे. वाराणसी विमानतळावर या नागरिकांना उद्या आणले जाणार आहे.
सविस्तर वाचा -वंदे भारत अभियान; लंडनमध्ये अडकलेल्या भारतीयांना उद्या आणणार परत
कराची - पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता एका नव्या व्हिडिओमुळे आफ्रिदी पुन्हा ‘व्हायरल’ होत आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या या व्हिडिओमध्ये तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘घाबरट’ म्हणताना दिसत आहेत.
सविस्तर वाचा -“नरेंद्र मोदी घाबरट”, शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे सर्वजण घरात अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकजणांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्येही लॉकडाऊन सुरू आहे. या कठीण काळात भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या मुलाबाबतची चिंता व्यक्त केली आहे. मुलगा पुन्हा आपल्या वडिलांना कधी भेटू शकेल, हे माहित नसल्याचे सानिया म्हणाली.
सविस्तर वाचा -“मुलाला वडिलांना परत कधी पाहता येईल?”, सानियाने व्यक्त केली चिंता
मुंबई- कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात बॉलिवूड कलाकारही चित्रपटांचं चित्रीकरण बंद असल्यानं घरीच वेळ घालवत आहेत. यादरम्यान सतत आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहाण्यासाठी कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
सविस्तर वाचा -उर्मिलानं फोटो शेअर करत चाहत्यांना केलं घरी राहाण्याचं आवाहन