- नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 3 हजार 967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
सविस्तर वाचा -COVID-19 : गेल्या 24 तासात आढळले 3 हजार 967 कोरोनाबाधित, तर 100 जण दगावले
- मुंबई - राज्यभरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमधील कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. राज्य पोलीस दलातील १०६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये ११२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामधील १७४ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच एकूण बाधितांपैकी आजवर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा -राज्यभरात १०६१ पोलीस कोरोना'पॉझिटिव्ह'; ११२ अधिकाऱ्यांचा समावेश
- नाशिक - कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलात भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असताना दुसरीकडे पोलीस दलातही दिवसागणिक बाधितांची वाढ होत असल्याने पोलीस दल पूर्णतः हादरून गेले आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना हवी तशी सुरक्षा मिळत नसल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे.
सविस्तर वाचा -मालेगावात पोलीस जीव धोक्यात घालून बजावतोय कर्तव्य, चांगल्या सुरक्षा साधनांचा अभावच..
- लखनऊ - उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये स्थलांतरीत मजूरांना घेऊन जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे. यामध्ये एका मजूराचा मृत्यू झाला असून, सहा मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सविस्तर वाचा -स्थलांतरीत मजूरांना घेऊन निघालेला ट्रक पलटला; एकाचा मृत्यू, सहा जखमी..
- नवी दिल्ली- कोरोना महामारीचे संकट आणि टाळेबंदीने देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना जागतिक बँकेने भारतासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जागतिक बँक भारताला १ अब्ज डॉलरची मदत करणार आहे.
सविस्तर वाचा -जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य
- नवी दिल्ली - दिल्लीच्या नॉर्थवेस्ट भागामध्ये आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. २.२ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. तसेच, जमीनीच्या १३ किलोमीटर खाली याचे केंद्रस्थान होते, अशी माहिती राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.