भोपाळ -महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मजूरांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरांच्या ट्रकला मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसची जोरदार धडक झाल्याने ८ मजूरांचा मृत्यू झाला तर ५५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरांच्या ट्रकला अपघात, ८ जणांचा मृत्यू ५५ गंभीर
लखनौ - उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर- सहारनपूर महामार्गावरुन बिहारला पायी घरी जाणाऱ्या मजूरांना वेगवान बसने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत ६ मजूरांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवार रात्री उशिरा अपघात घडल्याचे पोलीसांनी सांगितले.
सविस्तर वाचा -उत्तरप्रदेश: बिहारला पायी जाणाऱ्या मजूरांना बसने चिरडले, ६ जणांचा मृत्यू, ४ जखमी
नाशिक - जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश होता. निशा पंढरीनाथ किलिबले (वय 9, रा. उभीधोंड), योगिता पंढरीनाथ किलिबले (वय 12, रा. उभीधोंड) व पूनम संतोष बोके (वय 13, रा. अंबापूर) अशी मृत्यू झालेल्या तिघींची नावे आहेत.
सविस्तर वाचा -पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश
रायगड - कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोहोचली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा -महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण
मुंबई- छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वराज्य बाणा, पुरोगामी विचार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
सविस्तर वाचा -छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील - अजित पवार