महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 12, 2020, 9:00 AM IST

ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ पर्यंतच्या ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news at nine AM
Top 10 @ 9 AM : सकाळी नऊच्या ठळक बातम्या!

मुंबई :राज्याच्या अंतर्गत भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील चार तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांत पाऊस पडेल अशी माहिती मुंबई (कुलाबा) वेधशाळेचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

सविस्तर वाचा :राज्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता..

  • मुंबई- राज्यात गुरूवारी १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा :'कोरोना निदानाच्या ९५ प्रयोगशाळा कार्यरत, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के'

  • सोलापूर: वारंवार सूचना देऊन देखील कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दर्शविल्याने, होटगी रोडवरील 'युगंधर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'वर सोलापूर महापालिकेच्या वतीने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा :कोरोना रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयावर गुन्हा दाखल

  • सातारा - नगरपालिकेतील लाच प्रकरणाच्या अनुषंगाने आज पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची ‍लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कसून चौकशी केली. ही चौकशी सुमारे अडीच तास चालली. दरम्यान या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

सविस्तर वाचा :सातारा पालिका लाच प्रकरण : एसीबीकडून मुख्याधिकाऱ्यांची चौकशी; इतरांचाही लागणार नंबर..

  • मुंबई - विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांना यश येत असून पुढील दोन तीन दिवसांत विविध देशांतील १० गुंतवणुकदारांसोबत करार केले जाणार आहेत. याशिवाय अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशामधील गुंतवणुकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. रिब्युट इंडस्ट्रियल सेक्टर- पोस्ट कोविड या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.

सविस्तर वाचा :गुंतवणुकदारांसोबत लवकरच करार, स्थलांतरित मजुरांची नोंद ठेवणार - सुभाष देसाई

  • ठाणे : आपल्या सात वर्षांच्या मुलीची चाकूने गळा कापत हत्या करुन, आईने पुढे स्वतःचाही गळा चिरून घेतल्याची खळबळजनक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. मिनाबाई अशोक पाटील (३०) असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती पोलीस आहेत. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा :सात वर्षांच्या मुलीचा गळा चिरून खून करत आईनेही केली आत्महत्या..

  • मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात खाट न मिळणे, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे यासारख्या तक्रारी रोज येत होत्या. त्यावर, उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागांमध्ये विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणण्यासाठी 'वॉर्ड वॉर रूम' सुरू केले आहेत.

सविस्तर वाचा :कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू झाल्या ‘वॉर्ड वॉर रूम’..

  • चेन्नई- तामिळनाडू राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहीत जोडप्याची मधुचंद्राची पहिली रात्रच शेवटची ठरली. विवाह झाल्यानंतर पहिल्याच रात्री पतीने आपल्या पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल (बुधवारी) चेन्नईजवळील मिंजूर येथे घडली.

सविस्तर वाचा :असं काय घडलं....लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचा केला खून, नंतर स्वत:ही घेतली फाशी

  • नवी दिल्ली -चीन- भारत सीमा वाद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात स्वदेशीचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, ‘द कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) या संघटनेकडून ‘इंडियन गुड्स आवर प्राईड’ हे अभियान सुरु केले आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा :चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी CAIT चे अभियान सुरू; स्वदेशी बनावटीच्या मास्क आणि ग्लासचे अनावरण

  • नवी दिल्ली -जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी लॉकडाऊन काळात तब्बल 68 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर जूनपर्यंत 100 दहशतवादी ठार केले आहेत. यामध्ये काही परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 1 एप्रिल ते 10 जून या काळात झालेल्या विविध चकमकीमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. इतर सर्वजण कोरोनाचा सामना करत असताना सुरक्षा दले काश्मीरात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात गुंतले होते.

सविस्तर वाचा :'लॉकडाऊन काळात काश्मिरात 68 दहशतवाद्यांचा खात्मा'

ABOUT THE AUTHOR

...view details