महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या! - चारच्या ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!

By

Published : Jun 4, 2020, 4:20 PM IST

  • निसर्ग चक्रीवादळासंबंधी बातम्यांचा आढावा : Live Update निसर्ग चक्रीवादळ : कोकणात आंबा-काजू बागायतदारांना फटका, तर नाशकातही नुकसान
  • नवी दिल्ली - 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत, केंद्रिय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी विस्थापितांचा मुद्दा, बँकांची बुडित कर्जे, एमएसएमईज या मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. तसेच २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज अर्थव्यवस्थेच्या आत्यंतिक गरजेच्या मागणी बाजूचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असल्याची टिका खोडून काढत समर्थन केले.

सविस्तर वाचा :भारतीय आणि भारतीय कंपन्यांसाठी शक्य तो प्रत्येक उपाय करणार : अनुराग ठाकूर

  • मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकली असून, आज त्यांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 25 मे रोजी अशोक चव्हाण यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनाचे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.

सविस्तर वाचा: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात

  • बासू चॅटर्जी यांचा चित्रकार ते चित्रपट दिग्दर्शक हा प्रवास अचंबित करणारा आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला, चक्रव्यूह, मंझिल, स्वामी, प्रियतमा, शौकीन, चमेली की शादी, प्रेमविवाह, चितचोर यासारख्या गाजलेल्या सुमारे ५० चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. संवाद लेखक, पटकथाकार, चित्रपट निर्माता अशी ओळख असलेल्या बासूदा यांची टीव्ही मालिका क्षेत्रातही कामगिरी सरस ठरली.

सविस्तर वाचा :बासू चॅटर्जी : सामान्यांचे जगणे पडद्यावर साकारणारा प्रतिभावंत हरपला

  • रायगड - निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा :निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम : रायगडमध्ये दोघांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडीत

  • सातारा - आपसातील वाद मिटवण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या दोघांनी एकमेकांवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच थरकाप उडाला.

सविस्तर वाचा :साताऱ्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच एकमेकांवर वार; एकाचा मृत्यू

  • मुंबई - महानगरपालिका मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी विविध ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी क्वरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा :क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात माश्या; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

  • मुंबई -दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई 90 टक्के झाली, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरू झाला आहे, तरी अद्यापही मोठ्या नाल्याची सफाई झालेली नाही.

सविस्तर वाचा :नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप

  • अकोला - राज्यातील आरोग्य विभागात विविध प्रवर्गातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना सेवा पुरवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे एक ते दीड महिन्यात वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसह सर्वच प्रवर्गातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा :महिन्या दीड महिन्यात आरोग्य विभागातील 17 हजार पदे कायमस्वरूपी भरणार : आरोग्यमंत्री

  • औरंगाबाद -शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार केले आहे. सर्वसाधारणपणे आठ लाखांपेक्षा जास्त किंमतीत मिळणारे व्हेंटिलेटर आता तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहे. पूर्णतः मेड इन इंडिया असणारे हे यंत्र मोबाईलवर देखील नियंत्रित करता येणार आहे.

सविस्तर वाचा :औरंगाबादेत मोबाईलवरून नियंत्रित होणारे व्हेंटिलेटर तयार, तीन लाखांपेक्षाही कमी किंमत

ABOUT THE AUTHOR

...view details