- वाशिम - जिल्ह्यातील चांडस-पांगरखेडा रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 मे) दुपारी घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा -दुचाकी अपघातात एक जण ठार, वाशिम जिल्ह्यातील घटना
- मुंबई - कोरोनाचा कहर मुंबईसह राज्यात वाढत आहे. अशात लॉकडाऊनमध्ये परदेशातून जे भारतीय नागरिक मुंबईत येत आहेत आणि राज्यातील जे मजूर-नागरिक स्थलांतर करत आहेत, त्या सर्वांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली गेली आहे.
सविस्तर वाचा -'स्थलांतरितांसह परदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, अन्यथा परिस्थिती बिकट'
- मुंबई - बृहन्मुंबई परिसरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणी सदृृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगळवारी कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सविस्तर वाचा -तत्काळ कामावर हजर व्हा; महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदेश
- मुंबई- विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना डावलून इतरांना संधी देण्यात आल्याने त्याविषयीची नाराजी आणि त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले आहेत. काँग्रेसचे अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेले प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली नाराजी आज प्रकट केली आहे.
सविस्तर वाचा -सचिन सावंतांची पक्षाविरोधात जाहीर नाराजी..! ट्वीटरवरून काँग्रेस प्रवक्तेपद हटवले
- अकोला - अमोल मिटकरींनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून निवडणुकीत जाहीरसभा घेतल्या. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात 'अमोल मिटकरींना आमदार करणारच'! असे सांगितले होते. त्यानुसार मिटकरींना उमेदवारी देण्यात आली. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे.
सविस्तर वाचा -शेतकऱ्याचा मुलगा ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी, अमोल मिटकरींना 'अशी' मिळाली संधी
- मुंबई - राजकारण आणि समाजकारण यावर अनेकदा बेताल वक्तव्य करून कायम चर्चेत राहणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक आक्षेपार्ह हे ट्विट करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या काळात कोरोना आला असता तर कोणकोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार झाले असते, असा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.