- नवी दिल्ली - रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ११ सप्टेंबरला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कर्नाटकच्या बेळगाव मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करत होते. सविस्तर वाचा
- मुंबई - कोरोना प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू असताना २४ तासांत राज्यात २१ हजार २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ इतकी झाली आहे. राज्यात २ लाख ७३ हजार ४७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ४७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३३ हजार ८८६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सविस्तर वाचा
- हैदराबाद – कोरोनावरील लसीबाबत महत्त्वाची बातमी आहे. भारत बायोटेकने वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सल स्कूल ऑफ मेडिसीनबरोबर चिंप एडेनोव्हायरस या एकवेळ नाकातून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचा परवाना देण्यासाठी करार केला आहे. सविस्तर वाचा
- बुलडाणा -पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रति हेक्टर 25 हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी आज (बुधवार दि. 23) मोताळा तालुक्यातील परडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतात 'समाधी आंदोलन' करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतात स्वतःला गाडून घेत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सविस्तर वाचा
- मुंबई– देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत कोरोना योद्ध्यांची म्हणजे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये एकूण 30 टक्के पदे रिक्त आहेत. महापालिकेने पदभरतीकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका कोरोनाच्या आपत्तीकाळात आरोग्य सेवेवर झाल्याचा आरोप प्रजा फाऊंडेशनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
- कोल्हापूर - राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र, यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने 'लॉंग टर्म' विकास केला नाही. दरवर्षी तेच-तेच ठेकेदार नेमायचे. केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून काम करावे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सविस्तर वाचा
- मुंबई - राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी आता खासगी रुग्णालयातील परिचारिकांची सेवा अधिग्रहित करण्यास सुरुवात झाली आहे. पेणमधून याला सुरुवात झाली असून राज्यातही अशा प्रकारे खासगी परिचारिका या कामासाठी अधिग्रहित केल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परिचारिकांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. खासगी रुग्णालयातील परिचारिका अशाप्रकारे कमी झाल्यास खासगी रुग्णालयाची सेवा कोलमडून पडेल, असे म्हणत आता इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रनेही याला विरोध केला आहे. हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा
- मुंबई - मुंबईतील गेटवे ऑफ इंडिजावळ असलेल्या समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुखरुप वाचवले आहे. घरात बायकोशी भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात हा तरुण गेट वे जवळ आला असता त्याने समुद्रात उडी मारली. यावेळी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी दोर टाकून त्यास वाचवले. सविस्तर वाचा
- मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु, राज्यात 52 टक्के ओबीसी समाजातील अनेकांचे हातावर पोट आहे. त्यातच विमुक्त जाती आणि जमाती यांना 8 टक्के आरक्षण देण्यात आल्याने मूळ ओबीसींना केवळ 19 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी चुकीची आहे. म्हणूनच ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी भूमिका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. तसेच यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांना भेटणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सविस्तर वाचा
- मुंबई - ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप मी मुक्ताई नगरामध्येच असून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे खडसे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे. सविस्तर वाचा
Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..., वाचा एका क्लिकवर - top ten news today
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
9 PM