- मुंबई- राज्यात आता लॉकडाऊन नाही तर अनलॉकचीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. कोरोना नियंत्रणाच्या कामांमध्ये राज्याने घेतलेला पुढाकार नंतरच्या काळात इतर राज्यांनी स्वीकारला आहे. तसेच राज्याचे कोरोनावरील नियंत्रण हे इतरांच्या दृष्टीने आदर्श ठरले आहे. याबरोबरच कोरोना नियंत्रणात पारदर्शकता ठेवल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -'राज्यात आता लॉकडाऊन नसून अनलॉकचीच प्रक्रिया सुरू'
- अमरावती - आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात कोविड महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. यामुळे मद्यविक्री बंद आहे. अशा स्थितीत सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. यापैकी तिघांचा गुरुवारी आणि सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील कुरिचेदू मंडळाच्या मुख्यालयात घडली.
सविस्तर वाचा -आंध्र प्रदेशात सॅनिटायझर प्यायल्याने नऊ मद्यपींचा मृत्यू
- हैदराबाद - 'ऑनलाइन जुगारा'ला प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत विराटला अटक करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. कोहली व्यतिरिक्त अभिनेत्री तमन्ना भाटियावरही असाच आरोप लावण्यात आला असून तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -विराट कोहलीच्या अटकेची मागणी, उच्च न्यायालयात याचिका दाखल
- मुंबई - पाऊस येण्यापूर्वी भाषण सुरू करणे आणि पाऊस आल्यावर जाऊन भाषण करणे यात फरक असतो. हे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना कळणार नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पावसात भाषण केल्याने यश मिळते, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.
सविस्त वाचा -'पाऊस येण्यापूर्वी भाषण सुरू करणे अन् पाऊस आल्यावर जाऊन भाषण करणे यात फरक'
- औरंगाबाद -'पाण्यात भाषण केल्याने चांगले यश मिळते', असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांनी लोकसभा पोटनिवडणुकीवेळी भर पावसात भाषण केल्याने त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. आज दानवे यांनी औरंगाबादेत पावसातील भाषणाबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे.
सविस्तर वाचा -पाण्यात भाषण केल्याने चांगले दिवस येतात - रावसाहेब दानवे
- मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता पैशांच्या गैरव्यवहाराचा प्रकार उघड झाला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले आहेत. त्यामुळे ईडीने आपल्या अखत्यारीत या प्रकरणात लक्ष घालावे व तपास करावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.