- मुंबई- राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पटोले यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनामध्ये त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर वाचा-विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण
- मुंबई -मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कंगना रणौतवर टीका केली जात आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणामध्ये आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, असे म्हणत त्यांनी कंगनाच्या पाठीशी आपण असल्याचे म्हटले आहे.
सविस्तर वाचा-रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकसह सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक
- मीरा भाईंदर(ठाणे) - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला धमकी दिली आहे. कंगना मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे सरनाईक म्हणाले आहेत. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत: होऊन(सु-मोटो) दखल घेतली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा-प्रताप सरनाईक यांना तत्काळ अटक करा, कंगना रणौतवरील वक्तव्यानंतर महिला आयोगाची मागणी
- मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात सर्वाधिक 19 हजार 218 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 378 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- राज्यात कोरोनावाढीचा नवा उच्चांक.. शुक्रवारी 19 हजार 218 नव्या रुग्णांची नोंद, 378 मृत्यू
- मुंबई-मुंबई पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कंगना रनौत हिला मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सविस्तर वाचा-कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
- मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीमधील १०७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मृत पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी पूर्ण केले नसल्याने कर्मचारी आणि कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.