- नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर हा उणे २३.९ टक्के झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देत चिमटा काढला आहे.
सविस्तर वाचा -'आता पकोडे तळायची वेळ आलीय'....आर्थिक मंदीवरून कपिल सिब्बल मोदींवर बरसले
- जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण गुळ नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली आहे.
सविस्तर वाचा -गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू
- नांदेड- डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती होते. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
सविस्तर वाचा -शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेड येथे निधन; पार्थिव अहमदपूरकडे रवाना
- नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्यावर मंगळवारी लोधी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वाचा-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन..
- मुंबई -गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ४४५ स्थळं निश्चित करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सविस्तर वाचा-गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त
- पुणे - मानाचा पहिला गणपती कसबा गणेशाचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी, मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मात्र, यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा गणपतीच्या मंदिरात बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्येच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.