- नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या आरोग्य विषयक स्थायी समितीची उद्या(सोमवार) बैठक आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाचा प्रसार थांबेना...! संसदीय स्थायी समितीची सोमवारी बैठक
- सातारा- तरुणाकडून २५ हजार रुपयांची खडणी उकळल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी वनविभागातील परळीचे वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावलेसह अन्य दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा -सातारा: वनपालावर खंडणीचा गुन्हा, युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली होती धमकी
- पुणे- शहरात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे, अशी जी अफवा पसरवली जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
सविस्तर वाचा -पुणे शहरात कुठेही लॉकडाऊन नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - महापौर
- लातूर- राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात जेईईच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर शहरातील २ परीक्षा केंद्रावर आज आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या २ विषयाची परीक्षा पार पडली.
सविस्तर वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी-नियमांसह लातुरात पार पडली जेईई परीक्षा
- ठाणे- महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयातील एका ७२ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
सविस्तर वाचा -ठाण्यात वृद्ध कोरोनाबाधिताची आत्महत्या, रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
- नाशिक- येवला तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात मका व बाजरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.