राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपी जेट खरेदी केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. शनिवारी राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला. एकीकडे मोदींसाठी 8400 कोटींचे जेट खरेदी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवानांचा जीव धोक्यात घालून त्यांना नॉन बुलेट प्रूफ ट्रकमधून पाठवण्यात येत आहे. हा कसला न्याय, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
- 'जवानांसाठी नॉन बुलेट प्रूफ ट्रक अन् मोदींसाठी 8400 कोटींचे जेट'
हैदराबाद- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी अंशत: उठविली आहे. मात्र, राज्यातील कांदा निर्यात उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सरकारने निर्यात बंदी सर्व प्रकारच्या कांद्यावरील न काढता केवळ 'बंगलोर रोझ' आणि कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.
- नाशिकच्या कांद्याचा वांदाच...केंद्राकडून 'या' दोन प्रकारच्या कांदा निर्यातीला परवानगी
नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारे तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. किशन गंगा नदीच्या काठावर जवानांना दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहीम राबवली.
- पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारांची तस्करी, जवानांनी उधळला कट
मुंबई- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरण उघड केले आहे. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीचा विषय चर्चिला जात आहे. दरम्यान, या टीआरपी घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखे (EOW) कडून करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करणार असून, पोलीस उपायुक्त पराग मणेर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची तपासणी होणार आहे.
- टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखाही करणार
मुंबई- टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना 13 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक न्यूज नेटवर्कटच्या मुख्य वित्त अधिकरी शिवा सुब्रमण्यम सुंदरम या अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.
- टीआरपी घोटाळा: रिपब्लिक'च्या मुख्य वित्त अधिकाऱ्याला पोलिसांचे समन्स, आज चौकशी
पाटणा -आज दुपारी एक वाजून 30 मिनीटांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटण्याच्या दिघा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. पासवान यांचे गुरुवारी(8ऑक्टोबर) दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात निधन झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव हवाईदलाच्या विशेष विमानाने पाटण्या आणण्यात आले.
- रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर दिघा घाटावर आज होणार अंत्यसंस्कार
जम्मू आणि काश्मीर - कुलगाम जिल्ह्यातील छिनगम प्रांतात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. छिनगम प्रांतात अद्याप शोधमोहिम सुरू असून काही परिसर सुरक्षा यंत्रणांनी सील केला आहे. तसेच अद्याप चकमक सुरू आहे.
- कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; अद्याप चकमक सुरू
मुंबई- गृह विभागाकडून महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सध्याचे एटीएसचे प्रमुख देवेन भारतीयांना ॲडिशनल डीजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाठवण्यात आले.
- बदल्यांचा धडाका! राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई -राज्यात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. गेल्या काही दिवसात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मात्र, दिवसात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र, कमी होताना दिसत नाही. दिवसाला राज्यभरात 300 हून अधिक रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे.
- दिलासादायक.. राज्यात आतापर्यंत १२ लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांहून अधिक
ठाणे - दोन गटात झालेल्या राड्यात एका गटाने दुसऱ्या गटातील तरूणांवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील साई नगरात घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमी तरूणांवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
- भिवंडीत एका गटाकडून दुसऱ्या गटावर ॲसिड हल्ला; पाच ते सहा जण गंभीर