अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, १५ ऑगस्टला अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनी पुन्हा मैदानात पाहायला मिळेल. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ विजयी सुरूवात करण्यासाठी उत्सुक आहे.
सविस्तर वाचा -आयपीएलच्या रणसंग्रामाला आजपासून सुरूवात, सलामीला भिडणार मुंबई आणि चेन्नई
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली. याच्या विरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आलं आहे की, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्या सोबत झालेले गैरवर्तन असल्याचेही मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे.
सविस्तर वाचा -कंगनाच्या कार्यालयावरिल कारवाई योग्यच, तिची याचिका रद्द करावी - मुंबई महानगरपालिका
चंद्रपूर - दुचाकी चालविताना अचानक वीज कोसळल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे या दाम्पत्याला अवघ्या आठ महिन्याचे बाळ आहे. ही घटना ब्रह्मपुरी शहराजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वाचा -हृदयद्रावक..! आठ महिन्याचे बाळ झाले पोरके, वीज पडल्याने आई-वडिलांचा जागीच मृत्यू
मुझफ्फरपूर (बिहार) : भारतीय नौदलात पहिली महिला पायलट बनण्याचा मान सब-लेफ्टनंट शिवांगी यांनी कमावला आहे. भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात महिला अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश असतो. परंतु, शिवांगी ही नौदलातील पहिली महिला पायलट ठरली आहे.
सविस्तर वाचा -तिच्या पंखातही पोलादाचं बळ; जाणून घ्या 'नौदलातील पहिली महिला पायलट' शिवांगीबाबत...
मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव मांडला आहे. महापौरांविरोधात अविश्वास ठराव भाजपाने मांडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र पालिकेच्या 128 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आले. त्यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव पालिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास लिहिणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
सविस्तर वाचा -मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव, एकही झाला नाही मंजूर
मुंबई -राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांसोबत इतर मंडळाच्या शाळांमध्ये पहिल्या इयत्तेच्या प्रवेशाच्या वयासंदर्भात अनिश्चितता आहे. त्यातच शालेय शिक्षण विभागाने वय निश्चिततेचा कालावधी आता ३१ डिसेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना पुढील केंद्रीय स्तरावरील प्रवेशांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार असून त्यांना या संधीही गमवाव्या लागणार असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटल्या आहेत.
सविस्तर वाचा -शाळा प्रवेशाच्या वयासाठी पुन्हा अडवणूक? आता डिसेंबरपर्यंत आणली मर्यादा
नवी मुंबई - तळोजा येथे राहणारा तरुण बेपत्ता असल्याचा बनाव करत पत्नीला सोडून प्रेयसीसोबत पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याला कोरोना झाला असून, आपण जगणार नाही असेही त्याने पत्नीला खोटे सांगितल्याचे सत्य समोर आले आहे. मनीष मिश्रा (वय 28) असे या पतीचे नाव असून, तो आपल्या पत्नीला सोडून प्रेयसीसोबत मध्य प्रदेशातील इंदूर येथे पळून गेला होता.
सविस्तर वाचा -पत्नीला सांगितला कोरोनाचा बहाणा; तरुणाचा प्रेयसीसोबत इंदूरला पोबारा
नवी दिल्ली - कोरोना रुग्णसंख्येने देशात शुक्रवारी 52 लाखांचा टप्पा ओलांडला. 96,424 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 1,174 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,14,677 वर पोहचला आहे. यामध्ये 10,17,754 सक्रिय रुग्ण असून आत्तापर्यंत 41,12,552 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84,372 इतकी झाली आहे.
सविस्तर वाचा -देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर
नवी दिल्ली - प्रदीर्घ संघर्षाची सुरुवात आता झाली असून, आमचा पक्ष कायमच शेतकऱ्यांसोबत असल्याची प्रतिक्रिया हरसिमरत कौर बादल यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली. मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत गुरुवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली
सविस्तर वाचा -Interview : आमचा पक्ष शेतकऱ्यांसोबत - हरसिमरत कौर बादल
नांदेड- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची भूमिका असून सरकार त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. परंतु प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे काही निर्बंध आले आहेत. मागच्या सरकारने नियुक्त केलेले नामवंत विधिज्ञ याही सरकारच्या काळात न्यायालयात सरकारची बाजू मांडत आहेत. त्यामुळे आता ही लढाई आपसातली राहिलेली नाही, न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन ही लढाई लढणे गरजेचे असल्याचे आवाहन मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
सविस्तर वाचा -मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सर्वांनी एकत्र यावे- अशोक चव्हाण