- उस्मानाबाद -अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' असे शरद पवार म्हणाले आहेत. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
सविस्तर वाचा-...म्हणून शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!
- मुंबई -कुठल्याही शेतकर्यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सविस्तर वाचा-'शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत'
- मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (सोमवारी) मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. यावेळी १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या. परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये आपल्या ताटातील अर्धे जेवण दुसऱ्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.
सविस्तर वाचा-राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
- बुलडाणा- नेटवर्क ऑफ बुलडाणा या संस्थेने जिल्ह्यात ५० एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे संसार थाटले आहे. यात २० आंतरजातीय विवाह, २० विधवांचे पुनर्वसन, तर एकाच समाजतील १० युवक-युवतींचे संसार थाटण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-५० एचआयव्हीग्रस्त जोडप्यांनी थाटले संसार, नेटवर्क ऑफ बुलडाणाचा उपक्रम
- सोलापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी केंद्राकडून मदत घेण्यात गैर काय? असा सवाल विरोधकांना केला आहे.
सविस्तर वाचा-केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे
- मुंबई- ठाण्यातून मुंबई मधील भांडुप येथे खासगी कामासाठी जाणाऱ्या व्यक्तीची बॅग रिक्षात राहिली होती. रिक्षा चालकाला शोधून व्यक्तीला बॅग मिळवून देण्याचे काम भांडुप पोलिसांच्या पथकाने केले आहे. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र अहीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.