हैदराबाद - दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी ट्वीट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू देऊ न,ये असे आवाहन केले आहे. दिल्लीतील घटनेनंतर हैदराबाद शहरात त्या प्रकारची कोणतीही घटना घडू नये यादृष्टीने त्यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गेल्या ३ दिवसांपासून दिल्लीत हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी ट्वीट करून नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.