मुंबई - राज्यात आज १७ हजार ७९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यात २ लाख ७२ हजार ५७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ४१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३४ हजार ७६१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९ हजार ५९२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
सविस्तर वाचा -राज्यात दिवसभरात 17 हजार 794 नवे कोरोना रुग्ण; 19 हजार 592 कोरोनामुक्त
पुणे - केंद्राने जाहीर केलेली नवी कृषी विधेयके राज्यात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. त्यामुळे कृषी कायदा लागू न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. नवे कामगार विधेयक देखील लागू करायचे की नाही याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू, असे पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
सविस्तर वाचा -राज्यात नवीन कृषी विधेयके लागू करणार नाही - अजित पवार
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या ट्विटरवरून एक मेसेज ट्विट केला होता. त्यानंतर काही वेळाने ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून ते ट्विट डिलीट केले, असे उत्तर अजित पवार यांनी आज पुण्यात दिले. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारे ते ट्विट होते.
सविस्तर वाचा -वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून 'ते' ट्विट डिलीट केलं - अजित पवार
रत्नागिरी -खासदार विनायक राऊत यांनी टीकेच्या व्यतिरिक्त पुराव्यांबाबत कोणताच खुलासा केला नसून कागदही वाचू न शकणाऱ्या विनायक राऊतांनी आधी खुलासा करावा, असे आव्हान भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर पुराव्यासकट पत्रकार परिषदेत सादर केले होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे.
सविस्तर वाचा -खासदार विनायक राऊत दहावी नापास, कागदपत्रेही वाचू शकत नाही; नाणारवरुन निलेश राणेंची खरमरीत टीका
नवी दिल्ली- हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताविरोधात न्यायालयीन दावा लढणाऱ्या व्होडाफोनच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे 20 हजार कोटींची व्होडाफोनकडून होणारी करवसुली थांबण्याची शक्यता आहे. भारतीय कर विभागाने योग्य आणि समान वागणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
सविस्तर वाचा -धक्का! २० हजार कोटींच्या करवसुली प्रकरणात भारताविरोधात व्होडाफोनच्या बाजूने हेग कोर्टाचा निकाल