नांदेड- बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे शनिवारी रात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा -दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले; बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा गळा दाबून खून
अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मजुराला त्याच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले होते. शुक्रवारी रात्री त्याने एका झाडाला साडी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर अंगारे (वय 32) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक : विलगीकरणात ठेवलेल्या मजुराची गळफास घेऊन आत्महत्या.....
निलंगा (लातूर) – तू मुंबईवरून आला आहेस गावात का फिरतोस, याचा राग मनात धरून एकाने शेजारी गावातील नातेवाईकांना बोलावून मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या दोघांवर चाकूने वार हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वाचा -बाहेर का फिरतोस, म्हटल्याच्या रागातून अँटी कोरोना फोर्सच्या दोन तरुणांची हत्या, निलंग्यातील घटना
लातूर- पाणीपुरवठा योजनेकडे झालेले दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा दोन मजुरांच्या जीवावर बेतला आहे. पाणीटंचाईच्या झळा भासू लागल्याने 72 वर्ष जुन्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा ऑक्सिजन अभावी गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्घटना जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे घडली आहे. मारुती पवार व परमेश्वर केंद्रे अशी गुदमरुन मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.
सविस्तर वाचा -पाणीटंचाईच्या झळा; गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन मजुरांचा गुदमरुन मृत्यू
पुणे- दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. देशभरातील प्राणिसंग्रहालय या काळात बंद आहेत. या काळात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, याची माहिती उपसंचालक डॉ. निघोटे यांनी दिली आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. निघोटे यांच्याशी साधलेला संवाद खास वाचकांसाठी. . . .
सविस्तर वाचा -कोरोना इफेक्ट; प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या टिपल्या जातात हालचाली, घेतली जाते 'अशी' खबरदारी