- कोल्हापूर - अनेक मराठा तरुणांना नियुक्तीसाठी ऑर्डर मिळाली आहे. मात्र, कामावर घेतले जात नाही. आरक्षण मिळेलच. मात्र, तुमच्या हातात जे आहे ते आधी करा. याला चेतावणी समजा अगर विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सविस्तर वाचा-मराठा आरक्षण : 'हवा तर इशारा समजा! पण, हातात आहे ते करा'
- पुणे -मुलींवर संस्कार नसल्यानेच बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेन्द्र सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या विधानाचा समाचार घेतला असून खऱ्या संस्काराची गरज भाजपच्या नेत्यांना असल्याचे सांगितले.
सविस्तर वाचा-'भाजपाच्या नेत्यांनाच खऱ्या संस्काराची गरज'
- मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली. पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
सविस्तर वाचा-योगी आदित्यनाथ यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही - बाळासाहेब थोरात
- मुंबई- एका 19 वर्षीय तरुणाने आजारपणाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आदित्य अनिल कांबळे, असे तरूणाचे नाव असून आदित्य हा विक्रोळी सुदर्शन टेकडी पार्कसाईट येथे आपल्या कुटुंबासह राहत होता.
सविस्तर वाचा-विक्रोळीत आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
- मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर काही माध्यमांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला. सुशांत हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा बळी आहे वैगेरे, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, एम्स रुग्णालयाच्या अहवालातून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून टीका केली आहे.
सविस्तर वाचा-'महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?'
- चंदीगढ - पंजाब पोलिसांनी खलिस्तानी चळवळीशी संबधीत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. होशियारपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. 'खलिस्तान झिंदाबाद फोर्स' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.