- मुंबई- राज्यात कोरोना आणि त्याचे महाभयंकर संकट सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मागील काही दिवसांमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहेत. राज्यपाल हे पद संविधानिक दर्जाचे आणि सन्मानाचे असल्याने त्या स्थानी असताना सत्ताधारी पक्षाला आरोप करता येत नव्हता. मात्र, त्यासाठीचा संयम सुटल्याने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार भाई जगताप यांनी ट्विटमधून महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का? असा प्रश्न करत राज्यपालांच्या राजकीय घडामोडींवर निशाणा साधला आहे.
सविस्तर वाचा- 'राजभवनाला आरएसएस शाखा किंबा भाजपचे कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का?'
- नवी दिल्ली -मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत हा खटला पाच न्यायधिशांच्या घटनापीठाकडे पाठवला आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. गत वर्षी मिळालेल्या आरक्षणाच्या आधारे विविध ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक लाभ मिळाले होते. अनेकांना याच्या जोरावर नोकऱ्या मिळाल्या होत्या. मात्र, या निर्णयामुळे मराठा समजाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि. 15 सप्टें.) राज्यसभेत व्यक्त केली.
सविस्तर वाचा-'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मराठा समाजाचे नुकसान, केंद्राने आरक्षणाबाबत आपले मत मांडावे'
- मुंबई -कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम महत्त्वाचे शस्त्र ठरेल
- ठाणे - गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचे आदेश आव्हाड यांनी दिले. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत.
सविस्तर वाचा-रखडलेल्या पोलीस वसाहतीचा म्हाडा करणार पुनर्विकास; कर्मचाऱ्यांना मिळणार 567 सदनिका
- नवी दिल्ली - आम्हाला नवीन म्हणून खूप मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आहे. म्हणून आमचा अधिकार आमच्याकडून न हिसकावता आमचा पूर्ण पगार घ्या. मात्र, आमचा निधी द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. कोरोनाच्या या कालावधीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.
सविस्तर वाचा-आमचा पूर्ण पगार घ्या; पण, निधी द्या - नवनीत राणा
- मुंबई -राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याचे प्रकरण ताजे असतानाच आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना एका विद्यार्थी संघटनेने दूरध्वनीवरून धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इतर विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून सामंत यांना केलेल्या धमकीच्या फोनबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आहे.