- मुंबई - कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
सविस्तर वाचा-'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहीम परिणामकारकपणे राबवा
- मुंबई- राज्यात आज कोरोना १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण बरे झाले.
सविस्तर वाचा-राज्यात सोमवारी १७ हजार ६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- मुंबई- देशात आणि राज्यात कोरोनाविरोधी लढत असताना केला काही दिवसात ऑक्सिजन तुटवड्यामुळे जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. शासनाने आज दिलासादायक निर्णय घेऊन ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज मंत्रालयातून काढण्यात आली.
सविस्तर वाचा-ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
- मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे खासगी डॉक्टरांच्या समस्या मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खासगी सेवेतील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा विम्याचे कवच सरकार का नाकारत आहे? असा सवाल राज ठाकरेंनी या पत्रातून उपस्थित केला आहे.
सविस्तर वाचा-सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- औरंगाबाद- मराठा समाजाला पुढच्या ८ दिवसात न्याय द्या, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला दिला. औरंगाबादमध्ये मराठा समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षण संदर्भात पुढील वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला.
सविस्तर वाचा-मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा
- ठाणे - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणला दुर्दैवाने स्थगिती मिळाली. मात्र, मराठा आरक्षण टिकले पाहिजे. ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असल्याची माहिती नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिंदे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत मांडले.