- मुंबई -मुंबईत कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवार यांनीही टीका केली. आता ही कारवाई करण्याचीही वेळ नव्हती यामुळे लोकांच्या मनात एक शंका निर्माण होईल, असे विधान करून पवारांनी महापालिकेकडून करण्यात आलेल्या आलेल्या कारवाईवर टीका केली.
सविस्तर वाचा-'कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्याची ही वेळ नव्हती, तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'
- बीड - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मृत्यूदर देखील वाढलेला आहे. याचाच परिणाम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच चितेवर आठ कोरोनाबाधित मृतदेहांचे दहन केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये 1 ते 8 सप्टेंबर या आठ दिवसांमध्ये तब्बल 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वाचा-धक्कादायक : अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार
- रायगड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले हद्दीत असलेल्या फार्महाऊसबाबत संशयितपणे चौकशी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांची रायगड पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ उपस्थित आहेत. यानंतर ठाकरे फार्महाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सविस्तर वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसची रेकी करणारे तिघे रायगड पोलिसांच्या ताब्यात
- मुंबई - मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. येथील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देणे हेच मुळात अनपेक्षित आहे. यामुळे राज्य सरकार सरन्यायाधीश यांच्याकडे अर्ज करून न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश दुरुस्त करण्यासाठीची मागणी करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
सविस्तर वाचा-मराठा आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक - अशोक चव्हाण
- नवी दिल्ली - मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मात्र, त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे.
सविस्तर वाचा-मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- मुंबई - मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिने अभिनेत्री कंगना रणौत आज (दि.9 सप्टें) दुपारी मुंबईत आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला नियमाप्रमाणे 14 दिवस होम क्वारंटाइन केले जाते. मात्र, कंगनाने आपण मुंबईत जास्त दिवस राहणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तीला होम क्वारंटाइन केले जाणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.