मुंबई -माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.... देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळावी, असे साकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी घातले... सहा जणांनी एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली... तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चलन, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- जयपूर -तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चनल, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही. सध्या हे ई-मेल फॉरवर्डर्स कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष करत आहेत.
सविस्तर वाचा -विशेष : 'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा
- हैदराबाद -भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
सविस्तर वाचा -भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह
- पंढरपूर (सोलापूर) -देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळावी, असे साकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी घातले. गृहमंत्री देशमुख आषाढी वारीच्या सुरक्षा आढाव्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सविस्तर वाचा -'बा विठ्ठला...! देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे'
- सिंधुदुर्ग - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत नाराज आहेत. ते सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून आगामी काळात लोकसभा उमेदवार म्हणून ते काम करतील, असा गौप्यस्फोट मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे
सविस्तर वाचा -'दीपक केसरकर शिवसेनेत नाराज, नवा मार्ग निवडणार'
- वर्धा - सहा जणांनी एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. नराधमांनी या महिलेच्या नवऱ्याला बांधून, नवऱ्यासमोर हे कृत्य केले. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात घडली.