मुंबई -जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत... सांगली जिल्ह्यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून येथील जिनेशा भवरलाल पोरवाल ही ५ वर्षाची चिमुरडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली... राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे... महाराष्ट्रात बुधवारी ४ हजार १६१ जण कोरोनामुक्त झाले, यासह टॉप-१० बातम्या...
- श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अद्याप शोधमोहिम सुरू आहे.
सविस्तर वाचा -काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्याला कंठस्नान
- सांगली - जिल्ह्यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून येथील जिनेशा भवरलाल पोरवाल ही ५ वर्षाची चिमुरडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना बुधवार (२४ जून) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. जिनेशा ही आपली आई व इतर महिलांसमवेत बुधवारी बहे रामलिंग बेटावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी ही घटना घडली.
सविस्तर वाचा -सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात पाच वर्षाची चिमुरडी गेली वाहून
- बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या अजाणतेपणाचा फायदा घेत अत्याचार केल्याच्या आरोपावरुन तिच्या नात्यातील 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अत्याचारानंतर पीडित बालिकेला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सविस्तर वाचा -आत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
- मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.
सविस्तर वाचा -राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती; तर मेहता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार
- मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत बुधवारी नवे 1 हजार 144 रुग्ण आढळून आले असून, 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 69 हजार 625 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 3 हजार 962 वर पोहचला आहे. मुंबईमधून बुधवारी एकाच दिवशी 2 हजार 434 रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा -मुंबईत 2434 रुग्णांची एकाच दिवशी कोरोनावर मात तर 1144 नवीन रुग्णांची भर
- मुंबई- ऑक्सिजनच्या अभावी मित्राच्या गर्भवती बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तो स्वत:ची महागडी गाडी विकून गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम करत आहे. शाहनवाज शेख असे त्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वाचा -...म्हणून त्याने गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी विकली कार
- मुंबई - देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या राज्यात बुधवारी ४ हजार १६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण संख्या ७३ हजार ७९२ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. बुधवारी कोरोनाच्या ३ हजार ८९० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६२ हजार ३५४ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.
सविस्तर वाचा -राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२ टक्के - आरोग्यमंत्री
- नवी दिल्ली -कोरोना संकटातही देशातील आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी आज(बुधवार) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अवकाश क्षेत्र, शेतकरी सहाय्य, ग्रामीण विकास आणि लहान उद्योगधंदे यासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
सविस्तर वाचा -कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय....आता खासगी क्षेत्राला अवकाशाची दारं खुली
- तिरुवअनंतपुरम: भारत आणि चीनचा सीमावाद हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या सीमेवर असणाऱ्या भागामध्ये या वादामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्यामध्ये, केरळमध्ये असणाऱ्या एका चीनी गावामध्ये मात्र शांततेचे वातावरण दिसून येत आहे. ही टायपिंग मिस्टेक नाही! केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यामधील एका गावाचे नाव 'चायना जंक्शन' आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन सीमा तणाव : केरळमधील चीनी गावामध्ये शांततापूर्ण वातावरण..
- मुंबई- राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय काल सरकारने जारी केला. त्या निर्णयात गुणवत्तेनुसार प्रवेश देणे, या प्रक्रियेला हरताळ फासला जाणार आहे. यामुळे अकरावीचे प्रवेश हे 26 मार्च 1997 आणि 2003 मध्ये घेण्यात आलेल्या अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच केले जावेत अन्यथा याविरोधात आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा 'सिस्कॉम' संस्थेने दिला आहे.
सविस्तर वाचा -अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसारच राबवा अन्यथा न्यायालयात दाद मागू; सिस्कॉम संस्थेचा इशारा