महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - breaking news today

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

top-10-news-at-9-am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jun 23, 2020, 8:58 AM IST

मुंबई - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बांदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जवांनानी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले... मुंबईच्या मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथील भंगार गोदामात मोठी आग लागली आहे... इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे... दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • पुलवामा -जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बांदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले आहे. दरम्यान, या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.

सविस्तर वाचा -J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण

  • मुंबई- मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथील भंगार गोदामात मोठी आग लागली आहे.

सविस्तर वाचा -मानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे भंगार गोदामाला मोठी आग

  • जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीत ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी दिली.

सविस्तर वाचा -दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डात कोरोनाचा शिरकाव; ७ जणांना लागण

  • हैदराबाद - इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान अशी या 3 खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.

सविस्तर वाचा -पाकिस्तानला धक्का...! इंग्लंड दौऱ्याआधी 'या' 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

  • हैदराबाद - ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी आणि वाद यांचे खूप जवळचे नाते आहे. एकेकाळचे कट्टर कम्युनिस्ट असलेले कुलकर्णी बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर भाजपचे सदस्य बनले तेव्हा अनेकांना हादरा बसला. पुढे ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व नंतर लालकृष्ण अडवाणी यांचे जवळचे सल्लागार बनले. अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांची केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा मूळ मसुदा हा कुलकर्णी यांचाच होता, असा प्रवाद होता.

सविस्तर वाचा -अक्साई चीनवरचा हक्क सोडा आणि तडजोड करा; सुधींद्र कुलकर्णींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

  • मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आज ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले आहे. सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यातील १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा -CORONA : राज्यात ३,७२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह..६ लाख नागरिक होम क्वारंटाईन

  • मुंबई -शाळा-महाविद्यालयांच्या वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे. अंशत: अनुदानीत शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषीतला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही अजित पवार म्हणाले.

सविस्तर वाचा -अनुदान, शाळा-महाविद्यालय वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळात - अजित पवार

  • कोल्हापूर - जे राजीनामा नाट्य झाले, ते नियोजित होते. मला मिळणारे मंत्रिपद वरिष्ठ नेत्यांमुळे मिळाले नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भूयार यांनी केला होता. या विषयी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भूयार हे नवीन आहेत. ते नवखे आहेत. त्यांचा ही गैरसमज लवकरच दूर होईल. ते माझेच कार्यकर्ते आहेत. त्यांना निवडून आम्हीच आणले आहेत, आम्हीच त्यांना समजावून सांगू असे शेट्टी म्हणाले.

सविस्तर वाचा -देवेंद्र भूयार नवखे आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू

  • मुंबई- शहरातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्णालयातील बेड, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कोरोना उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक यांचे सहकार्य लाभत आहे. याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोना विरुद्ध लढत राहिलो, तर जुलै मध्यापर्यंत कोविड संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा -जुलै मध्यापर्यंत कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न - महापालिका आयुक्त

  • नागपूर- महापालिकेतील महापौर विरुद्ध आयुक्त वाद आता शिगेला पोहोचला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात बेकायदेशीर कारभार केल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला. या प्रकरणी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सीईओ म्हणून तुकाराम मुंढे यांनी खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, यासाठी दस्ताएवजांमध्ये फेरफार केल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला आहे.

सविस्तर वाचा -जोशी विरुद्ध मुंढे वाद शिगेला; 'स्मार्ट सिटी प्रकल्पात आयुक्तांकडून २० कोटींचा गैरव्यवहार'

ABOUT THE AUTHOR

...view details