नाशिक- सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दोन तास जोरदार झालेल्या पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली आहे. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची योग्य सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात, दुकानात साचले होते.यासह महत्वाच्या १० बातम्या...
- नाशिक- सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दोन तास जोरदार झालेल्या पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली आहे. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची योग्य सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात, दुकानात साचले होते.
सविस्तर वाचा -नाशकात मान्सूनपूर्व कामाचे तीन-तेरा; दोन तासाच्या पावसाने दुकानांमध्ये शिरले पाणी
- मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना रनौतने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर घराणेशाही जोपासल्यामुळे गुणवंत कलाकारांवर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवतो असे म्हटले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करुन सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर असल्याचा आरोप केला आहे. सुशांतसिंह राजपूत गेल्या पाच-सात वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करतोय. त्याला कोणीही गॉडफादर नव्हता त्यामुळे त्याच्या कामाची दखल घेतली गेली नाही, असे कंगना म्हणाली. आजवर त्याला कोणताही पुरस्कार न मिळल्याचा उल्लेख करत फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर तिने टीकास्त्र सोडले आहे.
सविस्तर वाचा -सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर - कंगना रनौत
- मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी गळफास घेत त्याच्या वांद्रे येथील घरी (दि. 14 जून) आत्महत्या केली. आज त्याच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडिलांनी त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला असून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी तो अनंतात विलिन झाला.
सविस्तर वाचा -सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, वडिलांनी दिला मुखाग्नी
- नवी दिल्ली - महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विधानावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार, असे आईनस्टाईन यांनी म्हटले होते. देशातील लॉकडाऊनने हे सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
सविस्तर वाचा-'अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार, हे लॉकडाउनने सिद्ध केले'
कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्यानंतर कामगारांना घरी पाठवण्याची सोय करण्यात आली. मात्र, आता पुन्हा बांधकाम सुरू करण्यासाठी कामगारच नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे 'स्किल लेबर'ची पोकळी भरून काढण्याचे आव्हान कंत्राटदारांसमोर आहे. यातच बाजारात घरांच्या किमती घसरल्याने संकटाची तीव्रता वाढलीय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक जयदीप राजे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.