मुंबई -शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. तर याशिवाय आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. तर कोरोनाच्या राज्यातील वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या सारख्या राज्यभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा....
सविस्तर वाचा - LIVE : उद्धव ठाकरे-शरद पवारांची बैठक संपन्न, तर हर्षवर्धन जाधवांनी केला राजकारणाला जय महाराष्ट्र
मुंबई - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याला तत्काळ विलग करत त्याच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. असे असताना मुंबईत आजच्या घडीला कित्येक कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने घरातच राहावे लागत आहे. मुंबई महापालिकेचे रुग्णालय असो वा सरकारी वा खासगी, बेडसाठी अनेकांना 10-10 तास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.
सविस्तर वाचा -'कुणी बेड देतं का बेड..!' कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत बेडच मिळेना..
औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. तर आपली राजकीय उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांचे नाव त्यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये अध्यात्मिक पुस्तक वाचून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर ही भूमिका जाहीर केली.
सविस्तर वाचा - हर्षवर्धन जाधवांनी घेतला राजकीय संन्यास; पत्नी असणार उत्तराधिकारी
हिंगोली- संपूर्ण देशात कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मोठ्या संख्येने लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तर, काही भागात पाणी टंचाई असल्यामुळे लोकांना अन्नासह पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पाणी उपलब्ध करून देत नसल्याने, अन ग्रामपंचायतीने साफ झुगारून लावल्याने, पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांनी स्वतःच पाचशे-पाचशे रुपये जमा करून श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला अन् खोदकामही सुरू केले आहे.
सविस्तर वाचा -पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थ झाले दशरथ मांझी, लोकवर्गणीतून विहिरीचे खोदकाम
जळगाव - श्रमिक रेल्वेने मुंबईहून मध्यप्रदेशात निघालेल्या परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती झाली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडली. रोशनी श्यामसुंदर जगताप असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
सविस्तर वाचा -श्रमीक रेल्वेने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मजूर महिलेला प्रवासात सुरू झाल्या प्रसवकळा, अन्... .