- मुंबई :राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग अद्यापही वाढता आहे. आज (रविवार) कोरोनाच्या ९ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तसेच, आज ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा :राज्यात ९ हजार ४३१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोेंद; २६७ मृत्यू, तर ६ हजार रुग्णांना डिस्चार्ज..
- भंडारा -जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून चार लोकांवर अमानुष मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळेत पोलीस पोहोचल्यामुळे एक मोठी घटना टळली आहे. या चारही लोकांना उपचारासाठी तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचा :भंडारा : जादूटोणा केल्याच्या संशयावरुन 4 लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
- जळगाव -मलकापूर येथून निघालेला एक कंटेनरचालक मद्याच्या नशेत तर्र झाला. यानंतर त्याने जामनेर तालुक्यातील नेरी ते जळगाव अशा २३ किलोमीटरच्या प्रवासात ३० पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा थरार आज (रविवार) दुपारी जळगावात घडला आहे. जळगाव रेल्वेस्थानकाजवळ रस्ता संपल्यामुळे मद्यधुंद चालकाने कंटेनर उभा केला. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय ३९ रा. कर्हे वडगाव, ता. आष्टी,जि. बीड) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.
सविस्तर वाचा :मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील ३० हून अधिक वाहने उडवली..
- पाटणा -बिहार राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असून अनेक जिल्ह्यांतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीने बाहेर काढत आहेत. दरम्यान, बुरी गंडक नदीच्या पाण्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणत असताना एका महिलेची बोटीतच प्रसूती झाली.
सविस्तर वाचा :बिहार: पुरातून बचाव करताना एनडीआरएफच्या बोटीत महिलेची प्रसूती
- पुणे - दिवसेंदिवस पुण्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव भव्य-दिव्य न करता साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा ऐतिहासिक, पौराणिक आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्याने यंदा गणेशोत्सवात देखावे सादर होणार नाहीत. पण त्याची कल्पना नसल्यामुळे शहरातील काही मूर्तिकारांनी देखावे तयार करण्याच्या कामाला सुरुवातही केली होती. यंदाच्या देखाव्यात चालू घडामोडी वर भर देण्यात आला होता. यामध्ये कोरोना, आत्मनिर्भर, राम मंदिर यासारखे विषय होते. परंतु यावर्षी देखाव्यांना मागणी नसल्यामुळे देखावे साकारणाऱ्यासमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवात देखावे नाहीत..!
- नवी दिल्ली - भारत चीनमध्ये मागील काही दिवसांपासून सीमावाद चिघळलेला आहे. पूर्व लडाखमधील हिंसाराचानंतर तणाव कमी करण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघाला नसून दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहेत. भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणाऱ्या एमीसॅट (EMISAT) या उपग्रहाने नुकतेच चीनमधील तिबेटची पाहणी केली आहे.