- मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ एहसान खान आणि अस्लम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एहसान यांचं वय 90 असून अस्लम यांचे वय 88 आहे. या दोघांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्याना काल(शनिवार) रात्री तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सविस्तर वाचा -दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ कोरोना 'पॉझिटिव्ह', श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं व्हेंटिलेटरवर
- मुंबई -मागील आठवड्यात फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अभिनेता संजय दत्त आज(रविवार) पुन्हा मुंबईतील लीलावती रुग्णालयात नियमित चेकअपसाठी येऊन गेला. यावेळी त्याची बहीण प्रिया दत्त देखील त्याच्या सोबत होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची तपासणी केली असता चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.
सविस्तर वाचा -अभिनेता संजय दत्त नियमित चेकअपसाठी लिलावतीमध्ये...भारतातच उपचार सुरु केल्याची चर्चा
- मुंबई- राज्यात आज ८ हजार ८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -आज ११ हजार नवीन रुग्णांचे निदान, तर बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर
- मुंबई - भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.
सविस्तर वाचा -माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण
- बीड- मनात जिद्द व चिकाटी असली की, कुठलीच बंधने तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाहीत. लॉकडाऊनमुळे पुण्यात असलेली नोकरी गमावलेल्या बीडच्या एका तरुणाने गावाकडे आल्यानंतर चक्क गाईच्या गोठ्यातून ग्राफिक्स सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.....
सविस्तर वाचा -बीडच्या तरुणाने चक्क गाईच्या गोठ्यातून केली ग्राफिक्स सॉफ्टवेअरची निर्मिती
- नवी दिल्ली -भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने धक्कादायक खुलासा केला आहे. भाजप नेत्यांची फेसबुक खाती आणि सबंधित ग्रुपवरून भारतात द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी माहिती पसरवली जात आहे. मात्र, भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, म्हणून कंपनी नियमानुसार कारवाई करण्याचे टाळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.