महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

top-10-news-at-11-am
Top 10 @ 11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 15, 2020, 9:05 AM IST

Updated : Jul 15, 2020, 11:00 AM IST

मुंबई -पक्षाविरोधात नाराज असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे... केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे... ईशान्य भारतामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या शंभरपेक्षा जास्त निमलष्करी जवान आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी...

  • नवीदिल्ली - राजस्थानच्या सत्तासंघर्षात आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात नाराज असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज त्यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

सविस्तर वाचा -मी भाजपमध्ये जाणार नाही..! सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण

  • नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या संबंधी घोषणा केली आहे.

सविस्तर वाचा -आज लागणार CBSE दहावीचा निकाल, येथे पाहा निकाल

  • शिलॉंग - ईशान्य भारतामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या शंभरपेक्षा जास्त निमलष्करी जवान आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी मंगळवारी रात्री ट्वीटद्वारे मेघालय राज्यातील जवानांची कोरोना परिस्थिती सांगितली. राज्यामध्ये एकूण 318 कोरोनाचे रुग्ण असून त्यातील 186 रुग्ण हे सीमा सुरक्षा दलातील जवान आहेत. मेघालयचे आरोग्यमंत्री ए. एल. हेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय हवाई दलातील कर्मचाऱ्यांना आणि दोन केंद्रीय निमलष्करी जवानांना कोरोनाची लागण झाली होती.

सविस्तर वाचा -ईशान्य भारतातील शंभरपेक्षा जास्त जवानांना कोरोनाची लागण

  • वर्धा- चीनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अ‌ॅप भारतभर लोकप्रिय आहेत. परंतु भारत आणि चीनच्या वाढत्या संघर्षानंतर चीनी वस्तू, चीनी अ‌ॅपवर बहिष्कार टाकण्याची मोहिम भारतभर सुरु झाली. त्यातच केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत ५९ चिनी अ‌ॅपवर बंदी घातली. यामध्ये भारतात लोकप्रिय असलेल्या 'टिकटॉक'चाही समावेश आहे. अशा वेळी 'टिकटॉक'ला प्रतिस्पर्धी असलेले भारतीय अ‌ॅप म्हणून 'चिंगारी' या अ‌ॅपला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. याशिवाय मित्रो, रोपोसो यासारख्या अ‌ॅपची ही चलती भारतात सुरू आहे. दरम्यान, टिकटॉकला अनेक पर्यायी अ‌ॅप बाजारात दिसून येत आहेत. या अ‌ॅपविषयी, जाणून घ्या खास रिपोर्टमध्ये...

सविस्तर वाचा -टिकटॉकला बाय बाय... आता कोण घेणार टिकटॉकची जागा?

  • हैदराबाद- भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासात देशात 28 हजार 498 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून, 553 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या 9 लाख 6 हजार 752 इतक झाला आहे. देशात मंगळवारपर्यंत (14 जुलै) 23 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा -देशात आतापर्यंत 23 हजार 727 जणांचा कोरोनाने मृत्यू; देशातील आढावा एका क्लिकवर...

  • ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या मानकोली नाका जवळ मंगळवारी रात्री एका इनोव्हाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

सविस्तर वाचा -मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात; चालक ठार, दोन गंभीर

  • भंडारा - तालुक्यातील सालेबर्डी या गावामध्ये पती-पत्नीची त्यांच्याच घरासमोर लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. जुन्या वैमन्यसातून शेजाऱ्यानेच हत्या केली असून, हत्येनंतर त्यांनी पोलिसांना समोर आत्मसमर्पण केले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे मृत दाम्पत्याच्या 5 वर्ष्याच्या मुलीसमोरच त्यांची हत्या करण्यात आली. विनोद बागडे(३९) आणि प्रियांका बागडे(३१) अशी दोघा मृतांची नावे आहेत. तर मंगेश गजभिये असे आरोपीचे नाव आहे. एका महिन्यात भंडारा तालुक्यातील हत्येची ही तिसरी घटना आहे. या हत्येनंतर भंडारा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा -कुत्रा ठरला निमित्त... भंडाऱ्यात पती-पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

  • चंद्रपूर- राज्यात सर्वत्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चंद्रपूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला आहे. रुग्णांची संख्या दोनशेवर गेली असली तरी या जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. एवढेच काय तर एकाही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचीसुद्धा पाळी आली नाही. ही बाब यासाठी अहोरात्र राबणाऱ्या जिल्हा यंत्रणेचे निश्चितच मनोबल वाढवणारी आहे. योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी हे जिल्हा यंत्रणेच्या प्रयत्नांचे फलित आहे. चंद्रपूरचा हा पॅटर्न निश्चितच राज्याचा आदर्श प्रयोग ठरलेला आहे.

सविस्तर वाचा -विशेष : आरोग्य यंत्रणेचे यश; जाणून घ्या कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू न झालेला 'चंद्रपूर पॅटर्न'

  • हिंगोली :शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची सवय लावली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला मात्र, ऑनलाईन दंड आकारला जात आहे. अशातच आज(मंगळवार) इंदिरा गांधी चौक येथे चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे वाहन चुकीच्या दिशेने वळविल्याने वाहतूक शाखेच्या महिला पथकाने 200 रुपांचे ऑनलाईन दंड आकारले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा -आमदार मुटकुळेंचे वाहन रॉंग साईड, महिला पोलिसांनी आकारला दंड

  • जळगाव- शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी दाखल केलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी देशी दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेत दोघे महिला कक्षातही घुसले होते. त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी देखील त्यांनी अरेरावी केली. कोविड केअर सेंटरमधील यंत्रणेला त्यांनी चांगलेच जेरीस आणले होते. या प्रकाराची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्याठिकाणी धाव घेत दोन्ही रुग्णांची खरडपट्टी काढली. दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -जळगाव महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पॉझिटिव्ह रुग्णांनी घातला गोंधळ

Last Updated : Jul 15, 2020, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details