मुंबई -पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राव यांना आदरांजली वाहिली आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत... पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान वापरलेल्या डिझेलवर मिळणाऱ्या परताव्याची 7 कोटी 40 लाख इतकी रक्कम एप्रिल 2018 पासून थकीत आहे... सहा जणांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या....
- हैदराबाद -भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
सविस्तर वाचा -भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह
- राष्ट्र निर्मितीसाठी सार्वजनिक धोरणे राबवण्याचे आणि प्रशासन चालवण्याचे त्यांचे कसब आणि मर्मदृष्टी. ज्यामुळे अनेकांनी त्यांना आधुनिक भारतातील चाणक्य ही उपाधी दिली, असे देशाचे महान विद्वान दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची २८ जून रोजी जन्मशताब्दी आहे. अल्पमताचे सरकार असताना ५ वर्षे पूर्ण कार्यकाळ यशस्वीरीत्या सरकार चालवण्याच्या त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे लोकांनी त्यांना आधुनिक चाणक्याची उपाधी दिली, अशा समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अभ्यासपूर्ण अष्टपैलू व्यक्तीमत्वाला सर्वप्रथम मी आदरांजली वाहतो.
सविस्तर वाचा -पी. व्ही. नरसिंह राव : आधुनिक भारतातील चाणक्य
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, मोदी ६६ व्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. यात ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात.
सविस्तर वाचा -पंतप्रधान मोदी आज 'मन की बात'द्वारे साधणार देशाशी संवाद...
- जयपूर -तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चनल, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही. सध्या हे ई-मेल फॉरवर्डर्स कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष करत आहेत.
सविस्तर वाचा -विशेष : 'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा
- पालघर- जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान वापरलेल्या डिझेलवर मिळणाऱ्या परताव्याची 7 कोटी 40 लाख इतकी रक्कम एप्रिल 2018 पासून थकीत आहे. यातील फक्त 50 लाख इतकीच रक्कम शासनाकडून मिळाली असून यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.