मुंबई -देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ लाख लाखांचा आकडा पार केला... लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण आलेले, नाईक सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे... सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे... मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही या रागातून १४ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली, यासह महत्वाच्या बातम्या...
- नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने ५ लाखांचा आकडा पार केला आहे. यात मागील २४ तासांमध्ये तब्बल १८ हजार ५५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे, आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
सविस्तर वाचा -देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
- पुणे- लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण आलेले लष्कराच्या 115 इंजिनिअर्सच्या तुकडीतील नाईक सचिन मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. 26 जून) सायंकाळी पुणे विमानतळावर खासगी विमानाने आणण्यात आले. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आणि हवाई दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव पुण्यातून लष्करी वाहनाने मालेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळगावी येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सविस्तर वाचा -पुणे विमानतळावर हुतात्मा सचिन मोरे यांना लष्कराकडून मानवंदना; आज मुळगावी होणार अंत्यसंस्कार
- मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने एक पत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम करु नये, अशा स्पष्ट सूचना गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा -सोसायटी पदाधिकाऱ्यांना चाप; आता वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांसह कामगारांना मज्जाव करता येणार नाही
- नाशिक -सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -मरण कोणाला आवडतं? पण, मला आता जगायचं नाही म्हणत विवाहितेची आत्महत्या
- मुंबई - देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर एकीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातून 15 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. तसेच प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यामुळे केईएम, सायन, जेजे रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.