मुंबई -योग हे एकतेचे प्रतिक असून वर्ण, लिंग, श्रद्धा, वंश आणि राष्ट्र अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव योगा करत नाही. ते माणूसकी टिकवण्याचे खूप मोठे माध्यम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले... जयपूर योगास्थली योगा सोसायटीच्या संचालक आणि फाऊंडर हेमलता शर्मा ही १२ तासांहून अधिक काळ योगा करत विश्वविक्रम नोंदवणार आहे... भारत-चीन या देशाच्या संबंधाबाबत बोलताना, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये, असा सल्ला वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी दिला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली -योग हे एकतेचे प्रतिक असून वर्ण, लिंग, श्रद्धा, वंश आणि राष्ट्र अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव योगा करत नाही. योगा एक माणूसकी टिकवण्याचे खूप मोठे माध्यम आहे. कोरोना महामारीने जगभर थैमान घातले असताना, आजच्या घडीला योगाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. आज सहावा जागतिक योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशाला संबोधन केले.
सविस्तर वाचा -'योग हे एकतेचे प्रतिक.. ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही'
- जयपूर- आज जागतिक योग दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने, जयपूर योगास्थली योगा सोसायटीच्या संचालक आणि फाऊंडर हेमलता शर्मा ही १२ तासांहून अधिक काळ योगा करत विश्वविक्रम नोंदवणार आहे. हेमलता याच्या या योगा प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रक्षेपण फेसबूकवरून करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा -Yoga Day Special : जयपूरची हेमलता विश्वविक्रमासाठी करणार सलग १२ तास योगा
- नवी दिल्ली - लडाख प्रांताच्या पूर्वेला स्थित गलवान व्हॅलीत चीनी सैन्याने घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ला चढवला. या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. तर चीनी सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिघळले आहेत. सध्या चीनकडून पुन्हा द्विपक्षीय चर्चेची मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या सद्यस्थितीतील पवित्र्यावर भाष्य केले. दोन्ही देशांतील संबंधांबाबात स्वातंत्र्यापासून पुढे आलेल्या मुद्द्यांचा उहापोह केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये ,असा सल्ला त्यांनी दिला.
सविस्तर वाचा -नेहरूंनी केलेली चूक पुन्हा मोदींनी करू नये - सुधींद्र कुलकर्णी
- नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे खबरदारी म्हणून कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. मात्र, प्रथमच, सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोटाची मागणी करणार्या याचिकेला परवानगी दिली आहे.
सविस्तर वाचा -सर्वप्रथमच, सर्वोच्च न्यायालयाकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोटाचा अर्ज मंजूर
- नवी दिल्ली - भारतासह जगभरात रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात राहूनच योग दिन साजरा केला जात आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये अक्षरक्ष: हाडं गोठवणाऱ्या थंडीत योग करत योग दिन साजरा केला. जवानांनी तब्बल १८ हजार फुटांवर हा योग केला.